Letest News
रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई
क्राईमशिर्डी

दमदाटी करत तरुणांकडून मोबाईल अन् पैसे घेऊन भर दिवसा भामट्यांनी केला पोबारा..!

काल भर सकाळी साडे दहाच्या सुमारास साई मंदिराच्या लगत भर वर्दळीच्या ठिकाणी एका हॉटेल मध्ये काम करणाऱ्या तरुणाला रस्त्यात अडवून चक्क जादू दाखवतो असे म्हणत आधी बोलण्यात गुंतवले व दमदाटी करून त्याच्याकडील मोबाईल आणि पैसे घेऊन एका भामट्याने पोबारा केल्याची खळबळजनक घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

शिर्डी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस प्रशासन आणि श्री साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागाने जोरदार कामगिरी करत छोट्या छोट्या चोऱ्या, पाकिटमारी आणि भाविकांच्या फसवणुकीच्या घटनांना बऱ्यापैकी आळा घातल्याचे चित्र आहे मात्र आता ह्या भामट्यांनी अनोखी शक्कल लढवत रस्त्याने जाणाऱ्या एकट्या दुकट्या व्यक्तीला अडवून हात चलाखी करत प्रसंगी दमदाटी करत लुबडण्याचे प्रकार होत असल्याने प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे विशेष लक्ष घालत दिवसा ढवळ्या यंत्रणेला आव्हान देत कार्यभाग साधणाऱ्या या अप प्रवृत्तीला आळा घालावा अशी मागणी आता पुढे येत आहे.

kamlakar

काल सकाळी साडे दहाच्या सुमारास साई मंदिर शेजारील जुन्या पिंपळवाडी रस्त्यावर नवीन दर्शन रांगेच्या पुलाखाली एक शिर्डीतील हॉटेल मध्ये कामाला असलेल्या मूळचा मध्यप्रदेश येथील तरुण गावावरून नुकताच आला अन् एक नंबर गेट जवळून आपल्या रूम कडे निघाला असताना एका 22 ते 25 वयोगटातील तरुणाने त्यास अडविले आणि तुला जादू दाखवतो असे म्हणत खाली पडलेला एक दगड त्याच्या हातात दिला आणि मूठ झाकून उघडल्यावर नकळतपणे हातचलाखी करत दगडाच्या जागी वीस रुपयांची नोट झाली आणि त्यानंतर बोलण्यात गुंतवून ठेवत भुरळ पाडून त्याचे पैसे आणि मोबाईल घेऊन सदर तरुणाने पोबारा केल्याचा अनोखा प्रकार घडल्याचे दीपक कुमार साहू याने साई न्यूज शी बोलतांना सांगितले दीपक ने सांगितलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आहेत

याबाबत दीपक साहू हा शिर्डी पोलिस स्टेशन ला तक्रार देण्यास गेला असता त्यास मोबाईल आणि सिम गहाळ झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले..

साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागाशी या तरुणाने संपर्क केला असता सुरक्षेच्या कारणास्तव व कायदेशीर बाबींमुळे संस्थान प्रशासनाला सीसीटीव्ही फुटेज देता येत नसल्याने या तरुणाला न्याय मिळणार कसा आणि चक्क दिवसा भाविकांची आणि नागरिकांची लुटमार करणारे हे भामटे जेरबंद कसे होणार….हा सवाल आता उपस्थित होत असून असेच प्रकार साईबाबा संस्थान च्या रुग्णालय परिसरात आणि इतर ठिकाणी देखील झाल्याचे समजते..मात्र घटना घडली त्या सकाळी दहा ते अकरा दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासून साईबाबा संस्थांनच्या सुरक्षा विभागाने तपासून आपल्या सध्या वेशातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना याबाबत सतर्क करून या टोळीचा पर्दाफाश करावा अशी मागणी आता साईभक्त व नागरिकांमधून होत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button