Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
Blog

फटाके वाजविण्यावरून मारहाण,दोन जखमी,चौघांवर गुन्हा

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुभाषनगर उपनगरात रहिवासी असलेले फिर्यादी दिपक भास्कर खंडांगळे वय-४२) यांनी आरोपी यांना,”तुम्ही फटाके वाजू नका माझे अंगावर येतात” असे म्हणाल्याचा राग येऊन आरोपी शुभम सोमनाथ पवार,सोमनाथ पवार,करणं भंडारी,व एक अनोळखी मुलगा आदींनी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या डोक्यात कडे मारून त्यास जखमी करून त्यास व त्यातील साक्षीदार आदींना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले असल्याचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”बेरियम आणि तत्सम रसायनांपासून तयार झालेल्या फटाक्यांवर सर्वोच्च न्यायलयाने बंदी घातली आहे.ही बंदी फक्त दिल्लीत लागू न होता संपूर्ण देशात लागू होईल असं न्यायालयाने म्हटलं आहे.सुप्रीम कोर्टाने म्हटलं की नवीन आदेशाची गरज नाही,या बाबत आधीच निर्देश दिलेले आहेत,त्यांच पालन करावं.दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी व्हावं या उद्देशाने सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले.सन-२०२१ च्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले होते की दिवाळीच्या आधी जे फटाके तयार केले जातात त्यात बेरियम किंवा कुठल्याही प्रतिबंधित रसायनांचा वापर केला जाऊ नये.फटाक्यांवर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली नाही पण ज्या फटाक्यांमध्ये बेरियमचा वापर आहे त्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे.पण पर्यावरणपूरक फटाके पेटवण्यास,उडवण्यास संमती आहे.मात्र या आदेशाचे पालन होताना दिसत नाही.त्यामुळे पर्यावरण आणि निसर्गाचा समतोल ढळताना दिसत आहे.त्यावरून अनेक ठिकाणी अपघात व तंटे बखेडे होत आहे.त्यावरून अनेकांची दिवाळी खराब होताना दिसत आहे.

kamlakar

अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरातील संजयनगर येथे घडली असून गल्लीत काही तरुण फटाके वाजवत असताना फिर्यादी दिपक अडांगळे यांनी वरील आरोपी यांना त्यास विरोध केला होता याचा राग येऊन आरोपी शुभम सोमनाथ पवार,सोमनाथ पवार,करणं भंडारी,व एक अनोळखी मुलगा (नाव गाव माहिती नाही) आदींनी दि.१३ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या डोक्यात कडे मारून त्यास जखमी करून त्यास व त्यातील साक्षीदार आदींना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले असून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.५२९/२०२३ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button