शिर्डी (प्रतिनिधी) —
शिर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मध्ये सौ. शोभाताई राजेंद्र सुभाषराव कोते पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन वाटचाल करणाऱ्या आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शोभाताई या जनतेच्या विश्वासास पात्र ठरत आहेत.

🪷 सामाजिक कार्यातून लोकांच्या मनात घर करणाऱ्या शोभाताई
शोभाताई राजेंद्र कोते पाटील या सामाजिक, धार्मिक व स्त्री-कल्याण क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी नेहमीच “सर्वसमावेशक विकास” हा दृष्टिकोन ठेवला आहे.
त्यांच्या कार्यात मीट भाषीय समाजासोबत सर्व समाजघटकांचा सहभाग असतो. नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत त्या स्वतः त्यावर उपाय शोधतात.
प्रभागातील महिलांमध्ये, तरुणांमध्ये आणि वयोवृद्धांमध्ये त्यांना विशेष मान्यता आहे.
🕉️ सशक्त कुटुंबाचा वारसा — देशभक्ती ते समाजसेवा
शोभाताईंचे सासरे श्री सुभाषराव गणपतराव कोते पाटील हे आणीबाणीच्या काळात लोकशाही रक्षणासाठी शिक्षा भोगलेले एक निडर व्यक्तिमत्व आहेत.
ते समकालीन साईभक्त तात्या पाटील व बायजामा यांच्या वंशातील असून, शिर्डी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून त्यांनी ग्रामविकासात मोलाचे योगदान दिले आहे.
त्याचबरोबर चुलत सासरे स्वर्गीय शंकरराव काळे, माजी आमदार अशोक काळे, आणि आशुतोष काळे या खांबी समर्थक कुटुंबाशी कोते परिवाराचे निकटचे संबंध आहेत.
शोभाताईंचे कुटुंबीय श्री बाबासाहेब शिवाजीराव कोते पाटील हे गौतम सहकारी बँक लि. चे माजी चेअरमन असून, त्यांनी महाराष्ट्रातील सहकार चळवळीतही आपला ठसा उमटवला आहे.
🙏 साईभक्तीतून समाजसेवेची प्रेरणा — राजेंद्र कोते पाटील यांचे कार्य उल्लेखनीय
शोभाताईंचे पती श्री राजेंद्र सुभाषराव कोते पाटील हे शिर्डी साईबाबा संस्थानाचे मानकरी तसेच उद्योजक असून, दरवर्षी लाखो साईभक्तांच्या सेवेत तत्पर असतात.
साई परिक्रमेच्या काळात ते स्वतःहून भक्तांसाठी मोफत चहा, बिस्किटे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात.
शिर्डीत आयोजित धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांच्या सहभागामुळे वातावरण भक्तिमय व उत्साही होते.
🌟 “जनतेच्या सेवेसाठी उमेदवारी” — शोभाताईंचा लोकाभिमुख निर्णय
प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांनी शोभाताई कोते पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी केली असून, जनतेच्या या अपेक्षेला प्रतिसाद देत त्यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.
त्यांच्या कार्यशैलीत संवेदनशीलता, पारदर्शकता आणि विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन दिसून येतो. शिर्डी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये आता महिला नेतृत्वाचा एक प्रभावी चेहरा उदयास येत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
शिर्डीत आज “जनतेच्या सेवेसाठी समर्पित महिला नेतृत्व” म्हणून शोभाताई कोते पाटील यांचे नाव मोठ्या आत्मीयतेने घेतले जात आहे.
शिर्डीकरांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत उत्साह आणि अपेक्षेची लाट निर्माण झाली आहे. 🌺
