Letest News
अहिल्यानगर-कोपरगाव-राहता येथे अतिक्रमणांवर कारवाई-मग शिर्डीत वेगळा न्याय का? लिंगनिदान रॅकेटचा आणखी एक सूत्रधार जेरबंद-५ सोनोग्राफी मशीन-१९ आरोपी आणि ६ डॉक्टर गजाआड समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुवि... लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री दीड लाखांचे दागिने सापडूनही मोह टाळला-स्वच्छता कर्मचाऱ्याने जपला साईसेवेचा मान दारूबंदी विभाग सुस्त-नगर परिषद मस्त-पोलिसांची सुरू आहे गस्त! शिर्डीत दारू धंदे सुरू आहे बिनधास्त वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा संकल्प-स्वराचा मुख्यमंत्री सहायता निधीस खारीचा वाटा-तांबे कुटुंबाच्... संविधान डोक्यावर घेऊन अशोक लोंढे यांची श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा-तुकाराम मुंडे यांच्या कार्याला ... श्री साईचरणी २९ लाखांचा सुवर्ण मुकुट ५.४० लाखांचा सोन्याचा ब्रोचही अर्पण न्यायासनावरील दरारा-मनात साईभक्ती-राजेश गुप्ता साहेबांना भावपूर्ण निरोप
Blog

जरांगे यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले

मराठा आरक्षणासाठी 26 जानेवारीला आंदोलन करण्यासाठी मराठा समर्थक घेऊन मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमधून निघाले आहेत. मुंबईतील मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात करणार असलेल्या जरांगेंनी शेवटची खेळी करत आंतरवालीमधूनच उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे मुंबईत यावं लागत आहे, अशी टीकाही मनोज जरांगे यांनी केली. आंतरवाली सराटीमधून निघण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सरकारवर हल्ला करताना त्यांचे डोळे पाणावले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


आंतरवाली सराटीमधील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘तुम्ही आरक्षण दिलं असतं तर मुंबईला जाण्याची गरज भासली नसती. मी समाजात असो अथवा नसो माझ्या छातीत गोळ्या जरी घातल्या तरी आता घेणार नाही. मी तुमच्यात असो-नसो आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेवू नका. अशी भावनिक साद ही त्यांनी समाजाला घातली. आतापर्यंत काय-काय घडलं आहे हे सगळ्यांना माहीत असून मुंबईच्या आंदोलनात एकत्र ताकद दाखवा असं आवाहनही त्यांनी केलं. मी असेल नसेल एकजूट फुटू देऊ नका आणि एकी तशीच ठेवा, असंही ते यावेळी म्हणाले. ‘आम्ही आमचेही टप्पे पाडलेले असून माझ्या सोबत किती लोक दिसतील माहीत नाही. पण मुंबई जवळ गेल्यावर हा आकडा कोट्यावधी आंदोलकांचा होणार असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. ही आता शेवटची लढाई आहे कुणीही घरी थांबू नका, असं आवाहन त्यांनी समाजाला केलं आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button