Letest News
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ... साईचरणी नतमस्तक झाले अभिनेते सोनू सूद-गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले समाधीचे दर्शन गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर ११३ साईभक्तांचे महादान रक्तदानातून मानवतेची खरी सेवा परवाना की गैरवापर? माजी उपसरपंचांशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या क्लबवर पोलिसांची कारवाई शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ...
राजकीयशिर्डी

साईचरणी नतमस्तक झाले अभिनेते सोनू सूद-गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले समाधीचे दर्शन

शिर्डी :
प्रसिद्ध सिनेअभिनेते, निस्सीम साईभक्त आणि समाजसेवक सोनू सूद यांनी गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त श्री साईबाबांच्या समाधीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. समाधी मंदिरात त्यांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होत देशाच्या सुख-समृद्धी व सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांच्या हस्ते सोनू सूद यांचा शाल, श्रीफळ व साईबाबांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
समाजसेवा आणि मानवतेच्या कार्यामुळे देशभरात विशेष ओळख निर्माण केलेले सोनू सूद हे श्री साईबाबांचे निस्सीम भक्त मानले जातात. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या शिर्डी भेटीमुळे उपस्थित साईभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या पावन समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी साईचरणी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button