Letest News
EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली
राजकीयशिर्डी

बाहेरचा आरोपी-बाहेरची विवाहित-बदनामी मात्र साईभूमीची!शिर्डीतील लॉजमध्ये अत्याचार-सराफाकडे अडीच तोळे सोने ‘मोड’

शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या पवित्र शिर्डीत लातूर जिल्ह्यातील एका विवाहित महिलेवर अत्याचार करून तिच्या अंगावरील अडीच तोळे सोने काढून ते थेट शिर्डीतील सराफाकडे विकले जाते, ही घटना केवळ गुन्हा नसून शिर्डीच्या सुरक्षाव्यवस्थेवरचा काळा डाग ठरत आहे.
या प्रकरणात आरोपी सुमित बालाजी शेळके (रा. उदगीर, जि. लातूर) याला अटक झाली असली, तरी खरे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
🔴 लॉजमध्ये बलात्कार — परवानगी कुणाची?
शिर्डीतील एका लॉजमध्ये विवाहित महिलेला डांबून तिच्यावर बलात्कार झाला.
प्रश्न स्पष्ट आहेत —
लॉज चालकाने ओळखपत्रे तपासली का?
नोंदवहीत खरी माहिती नोंदवली का?
विवाहित महिला व बाहेरचा तरुण एकत्र थांबत असताना संशय का आला नाही?
जर हे सगळे नियम मोडले असतील, तर लॉज चालक हा केवळ निष्काळजी नाही, तर गुन्ह्याचा मूक सहभागी आहे!
🔴 अडीच तोळे सोने – दोन लाखात ‘मोड’… सोनार आंधळा होता का?
पीडित महिलेचे अडीच तोळे सोने शिर्डीतील सराफाकडे रोख दोन लाख रुपयांना विकले गेले.
सोनाराने विचारले नाही —
हे सोने कुणाचे?
विक्रीसाठी परवानगी कुठली?
पावती, ओळख, नोंद?
सोनाराची ही ‘गप्पी’ ही गुन्ह्याला दिलेली मूक संमतीच नाही का?
🔴 बाहेरचे गुन्हे करतात, बदनामी शिर्डीची — हे कधी थांबणार?
आरोपी अविवाहित, पीडित महिला विवाहित, वयाने मोठी —
मग नेमकी कोणती आमिषे दाखवली? पैसा, लग्न, धमकी की ब्लॅकमेल?
हे पुढील तपासात उघड होईल, मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे — गुन्हेगार बाहेरचे असले तरी नाव खराब मात्र शिर्डीचं!
🔴 पोलीस कारवाई झाली, पण ‘सिस्टीम’ कुठे झोपली होती?
उदगीर पोलिसांनी शिर्डीत येऊन — ✔️ लॉजची पाहणी
✔️ खोलीचा पंचनामा
✔️ सराफाचा जवाब
हे सगळं केलं, पण प्रश्न राहतो — शिर्डी पोलिस आधी कुठे होते?
🔴 थेट मागणी : लॉज सील करा, सराफाचा परवाना रद्द करा!
या प्रकरणात — 👉 लॉज चालकावर गुन्हा दाखल करून लॉज तात्काळ सील करावी
👉 सोने खरेदी करणाऱ्या सराफाचा परवाना रद्द करावा
👉 शिर्डीतील सर्व लॉज व सराफांची विशेष तपासणी मोहीम राबवावी
साईबाबांची भूमी गुन्हेगारीसाठी मोकळी नाही — हे प्रशासनाने ठणकावून सांगायलाच हवे!

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button