Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
अ.नगरक्राईम

संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर ‘मोक्का’सारखी कठोर कारवाई

संगमनेर | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल, गोमांसाची वाहतूक व विक्री करून आर्थिक लाभ मिळविणाऱ्या कथित संघटित टोळीविरुद्ध संगमनेर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७८/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १११ (संघटित गुन्हेगारी) लागू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, ही कारवाई अत्यंत गंभीर मानली जात आहे.

१३ जुलै २०२६ रोजी पहाटे संगमनेर–पुणे मार्गावरील बुद्धविहाराजवळ पोलिसांनी टाटा कंपनीच्या छोटा हत्ती (MH-14 CD-0839) या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे ५०० किलो गोवंशीय जनावरांचे मांस आढळून आले. या कारवाईत सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

DN SPORTS

kamlakar

तपासात सलिम रियाज कुरेशी व अतिक ऊर्फ सोनू रफिक कुरेशी (दोघेही रा. मोगलपुरा, संगमनेर) यांची नावे निष्पन्न झाली. या आरोपींविरुद्ध यापूर्वीही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांनी आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी तयार करून गुन्हेगारी सुरू ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी प्रस्तावाची छाननी करून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ लागू करण्यास मंजुरी दिली.

या गुन्ह्यात समद जावेद कुरेशी (वय २८, रा. जमजम कॉलनी, संगमनेर) याला अटक करण्यात आली आहे. तर सलिम रियाज कुरेशी आणि अतिक ऊर्फ सोनू रफिक कुरेशी हे अद्याप फरार असून, त्यांच्याबाबत माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाकडे व संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button