Letest News
दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली
राजकीयशिर्डी

गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर साईचरणी सोन्याचा भक्तिभाव!झारखंडच्या साईभक्ताकडून २० ग्रॅम वजनाचा आकर्षक सोन्याचा ब्रोच अर्पण

शिर्डी : श्री साईबाबांच्या चरणी देशभरातील साईभक्तांकडून श्रद्धा, भक्ती आणि भावनेतून विविध स्वरूपात दान अर्पण केले जाते. श्रीकृष्ण जयंती अर्थात गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर झारखंड राज्यातील एका साईभक्ताने साईचरणी मौल्यवान सोन्याचा ब्रोच अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली.
या साईभक्ताने २० ग्रॅम वजनाचा, आकर्षक नक्षीकाम केलेला सोन्याचा ब्रोच श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला. या सोन्याच्या ब्रोचची देणगी मूल्य रु. २ लाख ८५ हजार १६० इतकी आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


गोकुळाष्टमीच्या दिवशी साईचरणी अर्पण करण्यात आलेल्या या सोन्याच्या ब्रोचमुळे भक्ती आणि श्रद्धेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. श्री साईबाबांवरील अढळ श्रद्धेतून भक्तांनी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंमध्ये या सोन्याच्या ब्रोचचीही नोंद झाली आहे.
संस्थानकडून साईभक्तांचा सन्मान
सोन्याचा ब्रोच अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला. यावेळी संस्थानच्या वतीने साईभक्तांच्या श्रद्धेचा सन्मान करण्यात आला.


दरम्यान, साईभक्तांच्या विनंतीनुसार त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. प्रसिद्धीपेक्षा साईसेवेला महत्त्व देत गुप्तपणे केलेल्या या भक्तीपूर्ण अर्पणाची साईभक्तांमध्ये चर्चा होत आहे.
“श्रद्धा आणि सबुरी”चा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या चरणी गोकुळाष्टमीच्या पावन दिवशी अर्पण करण्यात आलेला हा सोन्याचा ब्रोच भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचे प्रतीक ठरला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button