Letest News
नागवाणीने लोकचंदानीला धोपटले शिर्डीत हॉटेल समोर राडा! मेव्हण्याकडून शिवीगाळ दाजीला मारहाण शिर्डीच्या मुखदर्शन हॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास! गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर साईचरणी सोन्याचा भक्तिभाव!झारखंडच्या साईभक्ताकडून २० ग्रॅम वजनाचा आकर्ष... विखेंचा ‘डाव’ जरांगेंनी उघड केला? “आम्हाला मूर्खात काढण्याचे काम सुरू” जरांगेंच्या आरोपांनी राजकीय व... दाल में कुछ काला नहीं… पूरी दाल ही काली दिख रही है! दया साई संगम डिलक्स हॉटेलच्या चोरीत कुछ तो गडबड ... वडिलांची प्रकृती गंभीर तरी १५०० भाविकांची जबाबदारी खांद्यावर! ‘मंत्रीपद सेवेचे, गुंडगिरीचे नाही!’ मंत्र्यांनी मुलाला आवर घालावा- डॉ. राजेंद्र पिपाडांचा इशारा साफसफाई करताना सापडले ६.५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण- साई कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे केले संस्थानकडे जमा!र... ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजराने दुमदुमणार शिर्डी साई समाधी मंदिरात दोन दिवस विविध कार्यक्रम रील बनवा… टॅलेंट दाखवा… अन् जिंका तब्बल ५५५५ रुपयांचे प्रथम पारितोषिक!विकास गोंदकर पा. मित्र मंडळ व ...
Blog

दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरीता नवीन वाहन मालिका सुरू!

इच्छुकांनी 4 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

sai nirman
जाहिरात

अहमदनगर (प्रतिनिधी) दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरीता नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत असुन इच्छुक अर्जदारांनी 4 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 10.00 ते सायं.4-00 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काच्या डिमाड ड्राफ्टसह अर्ज चांदणी चौकातील नवीन इमारतीत खिडकी क्रमांक 14 येथे जमा करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

DN SPORTS


अर्ज सादर करताना वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांचा पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्डला सलंग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अहमदनगर कॅम्प बेंच, ट्रेझरी बॅच कोड नं १३२९६ करीता देय असणे आवश्यक आहे. एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी 4 डिसेंबर, 2023 रोजी सायं. 6.00 वाजता वाजता चांदणी चौक येथील नवीन इमारतीत नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंतीक्रमांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशा अर्जदारांनी 5 डिसेंबर, 2023 रोजी सायं. 4.30 वाजता पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सिलबंद करून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात उपस्थित रहावे,

kamlakar

तसेच लिलावासाठी उपस्थित राहणा- या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे. कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदानांना परत देण्यात येईल. विहीत वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही याची नोंद घेण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button