Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरक्राईम

समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे-आरोपींच्या अडचणी वाढणार

शिर्डी प्रतिनिधी : समता पतसंस्थेशी संबंधित बनावट खाते उघडून आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी राहता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 121/2026 च्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आदेशानुसार दिनांक 10 जून 2026 रोजी हा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) वर्ग करण्यात आला असून या पथकाच्या प्रमुखपदी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा प्राथमिक तपास राहता पोलिसांकडून सुरू असताना अनेक महत्त्वाचे पुरावे आणि कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली होती. समता पतसंस्थेशी संबंधित बनावट पद्धतीने उघडण्यात आलेल्या खात्यांचे अर्ज, व्यवहारांची माहिती, जमा व काढलेल्या रकमेची नोंद, आर्थिक देवाणघेवाणीचे तपशील आणि संबंधित कागदपत्रांची तपास यंत्रणेकडून छाननी करण्यात आली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तपासादरम्यान आर्थिक व्यवहारांची साखळी, खात्यांचा वापर करून झालेल्या व्यवहारांचे स्वरूप, तसेच त्यामागील सूत्रधार आणि लाभार्थी व्यक्तींची भूमिका उघड करण्याच्या दिशेने तपास वेगाने सुरू होता. याच पार्श्वभूमीवर प्रकरणातील प्रमुख संशयित अशोक खरात याचा ताबा घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य आणि आर्थिक व्यवहारांची व्याप्ती लक्षात घेऊन राज्यस्तरावरून हा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची अधिक सखोल, व्यापक आणि तांत्रिक चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासाच्या कक्षेत आणखी काही व्यक्ती येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती देताना अमोल भारती यांनी सांगितले की, राहता पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 121/2026 चा तपास 10 जून 2026 पासून अधिकृतपणे एसआयटीकडे वर्ग करण्यात आला असून पुढील सर्व तपासकार्य विशेष तपास पथकाकडून करण्यात येणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button