
शिर्डी : श्री साईबाबा संस्थान हे केवळ एक मंदिर नाही, तर कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धा, विश्वास आणि भावनांचे पवित्र केंद्र आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातून येणारा प्रत्येक भक्त साईचरणी नतमस्तक होताना मनात एकच अपेक्षा घेऊन येतो—”आपण साईंच्या छत्रछायेत सुरक्षित आहोत.” ही भावना जपण्याचे अत्यंत जबाबदारीचे कार्य श्री साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागाकडून केले जाते.
अनेक अधिकारी आले, अनेक गेले; पण आपल्या कार्यशैलीने, प्रामाणिकपणाने आणि कर्तव्यनिष्ठेने भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे सुरक्षा अधिकारी श्री माळी. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा विभागाने केवळ सुरक्षा पुरवली नाही, तर “भक्तसेवाही साईसेवा” या विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवले आहे.

मंदिर परिसरात एखाद्या साईभक्ताची मौल्यवान वस्तू हरवली तर ती परत मिळेल की नाही, याची चिंता अनेकांना असते. मात्र आज परिस्थिती बदललेली दिसते. सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा झालेली हरवलेली वस्तू संबंधित भक्तापर्यंत सन्मानाने पोहोचवली जाते. एखाद्या वृद्ध भाविकाच्या डोळ्यांत हरवलेली वस्तू परत मिळाल्याचा आनंद दिसतो, तेव्हा ते केवळ वस्तू परत मिळण्याचे समाधान नसते; तर साईबाबांच्या व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना असते.
सुरक्षा विभागातील अनेक तिसऱ्या व चौथ्या श्रेणीतील कर्मचारी प्रामाणिकपणे, कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य बजावत आहेत. उन्हाळा असो, पाऊस असो किंवा सण-उत्सवांची प्रचंड गर्दी असो, हे कर्मचारी शांतपणे आणि निष्ठेने सेवेत उभे असतात. त्यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आणि कौतुकास्पद आहे.
मंदिर परिसर, साईभक्त, संस्थानची संपत्ती आणि साईबाबांच्या खजिन्याची सुरक्षा ही अत्यंत मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीचे गांभीर्य ओळखून सुरक्षा अधिकारी माळी यांनी अनुभवी सुरक्षा रक्षकांना सोबत घेत एक सक्षम आणि सजग यंत्रणा उभी केल्याचे दिसून येते. गावातील परिस्थितीची जाण असलेले कर्मचारी आणि आधुनिक सुरक्षा व्यवस्थेचा समन्वय यामुळे सुरक्षा विभाग अधिक सक्षम झाला आहे.
श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, शिर्डीचे सुभाष शामराव कोतकर यांनी व्यक्त केलेल्या भावना अनेक साईभक्तांच्या मनातीलच आहेत. त्यांच्या मते, “साईभक्त म्हणजेच साईबाबांचे रूप” ही भावना जपून काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी हेच संस्थानचे खरे वैभव आहेत.
आजच्या काळात टीका करणे सोपे आहे; मात्र चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक करणेही तेवढेच आवश्यक आहे. सुरक्षा अधिकारी माळी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने साईभक्तांच्या सेवेसाठी केलेले कार्य हे निश्चितच गौरवास्पद आहे.
अखेर एकच… साईबाबांची समाधी आजही लाखो भक्तांना श्रद्धा, विश्वास आणि आशेचा आधार देते. त्या समाधीच्या सेवेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक प्रामाणिक सुरक्षा रक्षकाला आणि सुरक्षा अधिकारी माळी यांना मनःपूर्वक सलाम!
🌹 “साईभक्तांची सुरक्षा हीच साईसेवा आणि प्रामाणिक सेवा

