Letest News
समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुवि... लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री दीड लाखांचे दागिने सापडूनही मोह टाळला-स्वच्छता कर्मचाऱ्याने जपला साईसेवेचा मान दारूबंदी विभाग सुस्त-नगर परिषद मस्त-पोलिसांची सुरू आहे गस्त! शिर्डीत दारू धंदे सुरू आहे बिनधास्त वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा संकल्प-स्वराचा मुख्यमंत्री सहायता निधीस खारीचा वाटा-तांबे कुटुंबाच्... संविधान डोक्यावर घेऊन अशोक लोंढे यांची श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा-तुकाराम मुंडे यांच्या कार्याला ... श्री साईचरणी २९ लाखांचा सुवर्ण मुकुट ५.४० लाखांचा सोन्याचा ब्रोचही अर्पण न्यायासनावरील दरारा-मनात साईभक्ती-राजेश गुप्ता साहेबांना भावपूर्ण निरोप हिरोज ऑफ अहिल्यानगर २०२६ पुरस्काराने अशोकलाल (काका) लोढा यांचा गौरव मंगळसूत्र सापडले पण परत न करता खिशात टाकले-शिर्डीत चोरीचा गुन्हा दाखल
राजकीयशिर्डी

वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा संकल्प-स्वराचा मुख्यमंत्री सहायता निधीस खारीचा वाटा-तांबे कुटुंबाच्या संस्कारांचे कौतुक

तांबे कुटुंबाच्या संस्कारांचे कौतुक

शिर्डी | प्रतिनिधी
समाजकारण, संस्कार आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला तो शिर्डीचे भूमिपुत्र तथा श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त, क्रांती युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन तांबे यांच्या कुटुंबाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या आत्मीय भेटीत.
राजकारणातील व्यस्त वेळापत्रक, राज्याच्या विकासाची जबाबदारी आणि असंख्य बैठका यामधून वेळ काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तांबे कुटुंबीयांना दिलेला अमूल्य वेळ हा त्यांच्या मोठेपणाचा आणि माणुसकीचा प्रत्यय देणारा ठरला. ही भेट केवळ एका राजकीय नेत्याशी झालेली भेट नव्हती, तर एका कुटुंबाला लाभलेला प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचा अविस्मरणीय क्षण होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या भेटीतील सर्वात हृदयस्पर्शी क्षण ठरला तो सचिन तांबे यांची कन्या स्वरा हिचा. लहान वयातच समाजाप्रती असलेली जाणीव आणि सेवाभाव जपत स्वराने आपल्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीस खारीचा वाटा म्हणून योगदान अर्पण केले. संकटात सापडलेल्या गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी केलेले हे योगदान उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वराचे विशेष कौतुक करत तिच्या या संस्कारांचे श्रेय तांबे कुटुंबाला दिले.
यावेळी आणखी एक भावनिक प्रसंग घडला. सचिन तांबे यांचे चिरंजीव अभ्युदय याच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिशय प्रेमाने संवाद साधला. साहेबांच्या या आपुलकीने अभ्युदय भारावून गेला. बालमनाला स्पर्श करणारे हे प्रेम पाहून उपस्थितांच्याही चेहऱ्यावर आनंद झळकला. अभ्युदयने आपल्या निरागस भाषेत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि हा क्षण सर्वांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला.


सचिन तांबे हे नाव शिर्डीच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष आदराने घेतले जाते. त्यांनी स्थापन केलेले क्रांती युवक मंडळ हे आज शिर्डीच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनले आहे. साईबाबांच्या पालखी सोहळ्यापासून ते विविध धार्मिक उत्सव, सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, गणेशोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत मंडळाचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे.


विशेष म्हणजे, क्रांती युवक मंडळाने पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीला नवे बळ दिले आहे. या पथकात मुलांसोबत मुलींचाही मोठ्या उत्साहाने सहभाग असतो. संस्कृती, शिस्त, संघटन आणि सामाजिक बांधिलकी यांचा आदर्श युवकांपुढे ठेवण्याचे कार्य मंडळ सातत्याने करत आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली ही भेट तांबे कुटुंबासाठी केवळ एक आठवण नसून आयुष्यभर जपून ठेवावा असा भावनिक ठेवा ठरली आहे. स्वराचे समाजहितासाठीचे योगदान, अभ्युदयला लाभलेले मुख्यमंत्री साहेबांचे प्रेम आणि सचिन तांबे यांच्या सामाजिक कार्याची घेतलेली दखल यामुळे हा दिवस तांबे कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरला.
सेवा, संस्कार आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा सुंदर वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचत असल्याचे जिवंत उदाहरण म्हणजे तांबे कुटुंबीयांची ही प्रेरणादायी भेट होय.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button