Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
राजकीयशिर्डी

संविधान डोक्यावर घेऊन अशोक लोंढे यांची श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा-तुकाराम मुंडे यांच्या कार्याला अनोखा सलाम

शिर्डी | प्रतिनिधी
राज्यात अन्नभेसळ, दूधभेसळ आणि रासायनिक पदार्थांच्या वाढत्या वापराविरोधात कठोर कारवाईचा धडाका लावणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्याला आता सर्वसामान्य जनतेतूनही उत्स्फूर्त पाठिंबा मिळू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी संविधान डोक्यावर घेऊन श्रीरामपूर ते शिर्डी अशी पदयात्रा करत तुकाराम मुंडे यांच्या मोहिमेला अनोख्या पद्धतीने समर्थन दिले.
भर उन्हात, हातात कोणताही राजकीय झेंडा नाही, तर डोक्यावर भारतीय संविधान आणि अंगावर संविधान तसेच तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ संदेश लिहिलेले फलक घेऊन अशोक लोंढे यांनी सुरू केलेली ही पदयात्रा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. मार्गातील अनेकांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी राज्यभर भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट उत्पादनांवर कारवाई होत असल्याने भेसळ माफियांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिर्डीत पोहोचल्यानंतर अशोक लोंढे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “तुकाराम मुंडे हे केवळ अधिकारी नसून संविधानाच्या मार्गावर चालणारे एक धाडसी आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे. अनेक अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसून काम करतात, मात्र मुंडे साहेब प्रत्यक्ष मैदानात उतरून भ्रष्टाचार आणि भेसळीविरोधात लढा देत आहेत. महाराष्ट्राला अशाच अधिकाऱ्यांची गरज आहे.”


त्यांनी पुढे सांगितले की, “आज तुकाराम मुंडे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मी संविधान डोक्यावर घेऊन श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा केली. शिर्डीत येऊन साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली की, राज्यातील आणि देशातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळो आणि त्यांनीही मुंडे साहेबांप्रमाणे जनहितासाठी काम करावे.”


साईनगरी शिर्डीत पोहोचलेल्या या अनोख्या पदयात्रेची चर्चा सर्वत्र रंगली असून, संविधानावरील श्रद्धा, प्रामाणिक प्रशासनावरील विश्वास आणि समाजहितासाठीची तळमळ यांचे प्रतीक म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.


चौकट
“डोक्यावर संविधान, मनात जनहिताचा विचार”
सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी तुकाराम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा करत संविधानाला वंदन केले. “भेसळमुक्त महाराष्ट्र आणि प्रामाणिक प्रशासन” हा संदेश देणारी ही पदयात्रा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे जनतेच्या भावना आणि संविधानावरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button