
अहिल्यानगरमध्ये भेसळयुक्त कुल्फीचा भंडाफोड! १८५६ पॅकेट्स जप्त – नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच? 🔥
अहिल्यानगर : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या धडक कारवाईत भेसळयुक्त कुल्फीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून तब्बल १८५६ पॅकेट्स कुल्फी जप्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांच्या स्वास्थ्याशी थेट खेळ सुरू असल्याचा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.
तपासणीदरम्यान जप्त करण्यात आलेली कुल्फी ही Amul कंपनीशी संबंधित असल्याचे समोर आले असून, त्यामध्ये नियमबाह्य पद्धतीने वनस्पती तेल आणि फॅटचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार दुग्धजन्य पदार्थांमध्ये अशा घटकांचा वापर करण्यास स्पष्ट बंदी असतानाही हा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नमुने तपासणीदरम्यान ही गंभीर बाब उघड झाली. यानंतर संबंधित कंपनीला तत्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे काही उत्पादक नियम पाळत असताना काहींकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण उद्योगाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला असला, तरी अशा प्रकारांमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर आळा बसणार का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
👉 नागरिकांच्या ताटात भेसळ पोहोचत असेल, तर ही केवळ कारवाई नाही तर संपूर्ण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह असल्याची भावना व्यक्त होत आहे.

