Letest News
गॅस टंचाईची चाहूल-शिर्डी साई प्रसादालयावर परिणामाची शक्यता गॅसचा वापर काटकसरीने करा-अफवांवर विश्वास ठेवू नका – बबनराव भुसारी ShirdiNews #RickshawIssue#शिर्डीत मीटरविना रिक्षांचा हैदोस-साईभक्तांची सर्रास लूट – प्रशासन झोपेत का... Shirdi #SaiBaba #TatyaKotePatil #SaiBhakt #ShirdiNews #SaiDevoteesसाईबाबा के परम भक्त स्व. तात्याजी ... #Shirdi #Saibaba #TatyaKotePatil #साईबाबांचे जिवलग भक्त कै. तात्याजी गणपतराव कोते पाटील यांची ८१ वी ... #StopFemaleFoeticide#भ्रूणहत्या रोखण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा सरसावले #GrowmoreScam#जेलची हवा लागताच ‘ग्रोमोर’चा ठगसेन भूपेंद्र सावळे गयावया करू लागला “मला बाहेर काढा… सर... ShirdiCrime #ShirdiPolice #GoldTheft #ShirdiNews #SDNews# पालखी मिरवणुकीतील चोरीचा तपास वेगात-चोरट्य... मातृछत्र हरपले… शिर्डीतील सौ. कमल शांताराम मिराणे यांचे दुःखद निधन साईनगरीत मान्यवरांचे आगमन- राम शिंदे आणि रामदास आठवले यांनी घेतले समाधीचे दर्शन
राजकीयशिर्डी

ShirdiNews #RickshawIssue#शिर्डीत मीटरविना रिक्षांचा हैदोस-साईभक्तांची सर्रास लूट – प्रशासन झोपेत का?

शिर्डी :
राज्यात ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत असताना साईनगरी शिर्डीत मात्र पूर्णपणे उलट चित्र पाहायला मिळत आहे. येथे शेकडो रिक्षा मीटरशिवायच धावत असून साईभक्तांकडून उघडपणे मनमानी भाडे उकळून त्यांची सर्रास लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. विशेष म्हणजे ही लूट सर्वांसमोर सुरू असतानाही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दररोज हजारो साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात. रेल्वे स्थानक, बसस्थानक, मंदिर परिसर आणि शहरातील प्रमुख चौकांमध्ये रिक्षाचालकांकडून मीटर न लावता थेट भाविकांशी घासाघीस करून भाडे आकारले जात असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी अवघ्या काही अंतरासाठी 200 ते 500 रुपयांपर्यंत भाडे मागितले जात असल्याच्या तक्रारी भाविकांकडून होत आहेत.
नियमांनुसार प्रत्येक ऑटो रिक्षामध्ये मीटर बसविणे बंधनकारक आहे.

मात्र शिर्डीत अनेक रिक्षांमध्ये मीटरच नसल्याचे उघडपणे दिसत आहे. इतकेच नव्हे तर काही रिक्षा परवाना, नोंदणी किंवा अधिकृत कागदपत्रांशिवायच धावत असल्याचीही चर्चा शहरात आहे. त्यामुळे अधिकृत व नियम पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर अन्याय होत असून त्यांची उपजीविकाही धोक्यात आली आहे.


शिर्डी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धार्मिक पर्यटन स्थळ असताना अशा प्रकारे भाविकांची लूट सुरू असणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब मानली जात आहे. परिवहन विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त कारवाई करून मीटरविना धावणाऱ्या तसेच बोगस रिक्षांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


दरम्यान, राज्य शासन रिक्षाचालकांच्या कल्याणासाठी योजना राबवत असताना शिर्डीत मात्र नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना प्रशासन का गप्प आहे? असा संतप्त सवाल नागरिक व साईभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button