Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
अ.नगरक्राईम

दीपक पोकळे ला अटक झाल्या नंतरही राहात्यात मटका बिंगो गुटखा बंद का होत नाही?पोलीस ठाण्याजवळच अवैध साम्राज्य! कारवाई शून्य म्हणजे दुर्लक्ष की संरक्षण?

राहाता | निर्भीड दैनिक साईदर्शन – विशेष तपास अहवाल
काल निर्भीड दैनिक साईदर्शनने
राहाता शहरातील गुटखा बिंगो–मटका–जुगाराच्या खुलेआम सुरू असलेल्या अवैध साम्राज्यावर घणाघाती प्रहार केला.
पण प्रश्न इथे संपत नाही…
👉 एकदा बातमी आली तरी मटका का बंद होत नाही?
👉 पोलीस कारवाई का फक्त कागदावरच दिसते?
कारण हा एखादा धंदा नाही —
हे ‘व्यवस्थित चालवलेले गुन्हेगारी नेटवर्क’ आहे!
🕸️ टपरी नाही… हा साखळीबद्ध उद्योग आहे!
राहाता शहरात मटका जुगार गुटखा एका ठिकाणी नाही,
तो साखळी पद्धतीने चालतो —
▪️ पाण टपरीवाला
▪️ आकडे लिहिणारा
▪️ पैसे गोळा करणारा
▪️ ‘हप्ता’ घेणारा
▪️ आणि शेवटी… संरक्षण देणारे चेहरे
ही साखळी तोडायची असेल,
तर फक्त टपरी फोडून उपयोग नाही.
👀 कारवाई आधीच कळते… कशी?
धक्कादायक वास्तव समोर आले आहे —
👉 पोलीस कारवाई होण्याआधीच
👉 मटका अड्डे बंद होतात गुटखा गायब होतो बिंगो तात्पुरता बंद होतो
👉 पैसे, कागद, आकडे गायब होतात
मग काही वेळात
पुन्हा नव्या ठिकाणी धंदा सुरू!
❓ म्हणजे कारवाईची माहिती आधी कोण देतो?
❓ पोलीस खात्यातील ‘लीक’ कोण आहे?
हा प्रश्न आता गंभीर बनतोय.
💰 खून करणाऱ्यांच्या खिशात पैसा कुठून?
कालच्या खुनाच्या प्रकरणात अडकलेली टोळी
इतकी आर्थिकदृष्ट्या मजबूत कशी?
▪️ वकील
▪️ जामीन
▪️ वाहनं
▪️ मोकाट फिरणं
हे सगळं मटका–जुगारातून गुटख्यातून येणाऱ्या काळ्या पैशातूनच!
👉 म्हणूनच अवैध धंदे = थेट गुन्हेगारी!
⚠️ एक गुन्हा नाही… अनेक गुन्ह्यांची पाळेमुळे!
मटका म्हणजे फक्त जुगार नाही —
✔️ अपहरण
✔️ खंडणी
✔️ मारहाण
✔️ खून
✔️ महिलांवरील अत्याचार
✔️ युवकांचे भविष्य उद्ध्वस्त
हे सगळं याच धंद्याचं ‘साइड इफेक्ट’ आहे.
👮 वरचे अधिकारी स्वच्छ… पण खालचा खेळ काळा!
जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी
कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक आहेत,
पण — 👉 काही खालच्या स्तरावरील कर्मचारी
👉 गुन्हेगारांचे संरक्षण करत आहेत
👉 त्यामुळे संपूर्ण यंत्रणा बदनाम होतेय
वरचे आदेश खाली पाळले जात नाहीत — हीच खरी समस्या!
🔥 आता प्रश्न थेट जिल्हा प्रमुखांना!
निर्भीड दैनिक साईदर्शनचे थेट सवाल —
❓ राहात्यातील मटका अड्ड्यांची यादी तयार झाली आहे का?
❓ कोण कोण हप्ता घेतंय, याची चौकशी होणार का?
❓ कारवाईपूर्वी माहिती फुटते, याची अंतर्गत चौकशी होईल का?
❓ मोक्का कधी लागणार?
नागरिक उत्तरांची वाट पाहत आहेत.
🚨 नागरिकांचा इशारा – आता संयम संपतोय!
राहाता शहरातील नागरिक स्पष्ट सांगत आहेत —
“आता फक्त बातम्या नकोत,
प्रत्यक्ष बंदोबस्त हवा!
मटका बिंगो गुटखा बंद नसेल, तर आंदोलन अटळ आहे.”
📰 पुढील भाग – PART 3 मध्ये काय?
🔥 मटका जुगार गुटख्याचे रॅकेट चालवणारे ‘मोठे मासे’ कोण?
🔥 कोणत्या भागातून हप्ता गोळा होतो?
🔥 कोणत्या वेळेला पोलिस गायब असतात?
🔥 कोणत्या नावांची शहरात कुजबुज आहे?
👉 सर्व उघड होणार आहे…
⚠️ निर्भीड दैनिक साईदर्शनचा स्पष्ट इशारा
ही लढाई
एक दिवसाची नाही,
एक बातमीची नाही…
👉 जोपर्यंत अवैध धंदे बंद होत नाहीत,
तोपर्यंत निर्भीड दैनिक साईदर्शन थांबणार नाही!

sai nirman
जाहिरात

१७ गुन्हे दाखल असलेला दीपक पोकळे मोकाट कसा होता ?
राहाता परिसरात ‘बिंगो’, गुटखा व व्याजव्यवसाय राजरोस
पोलीस ठाण्याच्या हाकेवर धंदे, तरीही कारवाई शून्य!
१७ गंभीर गुन्ह्यांचा थरारक इतिहास

राहाता, शिर्डी, संगमनेर व लोणी पोलीस ठाण्यांमध्ये दीपक पोकळे याच्यावर तब्बल १७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून (302), खुनाचा प्रयत्न (307), दरोडा (395), सशस्त्र दरोडा (397), आर्म ॲक्ट, मकोका, तसेच नव्या भारतीय न्याय संहितेतील अनेक गंभीर कलमे यांचा समावेश आहे. इतक्या गंभीर गुन्ह्यांचा आरोपी असतानाही तो मोकाट फिरत होता हे वास्तव धक्कादायक आहे. बिंगो जुगार, गुटखा व व्याजव्यवसाय सुरु असल्याचे खुलेआम आरोप आहेत राहाता येथे पोलीस ठाण्याच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर बिंगो (जुगार) दुकान बेकायदेशीर गुटखा विक्री अवैध व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय हे सर्व राजरोसपणे सुरू होते आणि आजही सुरू आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी इतक्या बिनधास्तपणे हे धंदे कसे चालवतो, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. पोलीस कारवाई का होत नाही? संशय अधिक गडद इतके सर्व घडत असताना पोलीस कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने गंभीर संशय निर्माण झाला आहे. पोलीस ठाण्याच्या हाकेवर बेकायदेशीर धंदे सुरू असतील आणि तरीही कारवाई होत नसेल, तर हे दुर्लक्ष आहे की आशीर्वाद?” असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. ‘पोलीस पाठींबा’ असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की, या अवैध धंद्यांना काही राहाता येथील पोलीस अधिकाऱ्यांचा व पोलीस कर्मचाऱ्यांचा मूक पाठींबा तर नाही ना? जर तसे नसेल, तर आजतागायत एकही मोठी कारवाई का नाही? कारण दीपक पोकळे जेलमध्ये गेल्यानंतरही हे धंदे सुरूच आहेत हा प्रश्न पोलिसांच्या विश्वासार्हतेवरच बोट ठेवणारा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी
गुन्हे शाखा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अन्न भेसळक विभाग यांनी स्वतःहून दखल घेऊन चौकशी करावी, अन्यथा “गुन्हेगारांना संरक्षण आणि कायद्याला दुय्यम वागणूक” असा संदेश समाजात जाईल, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button