Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
राजकीयशिर्डी

लोकशाहीच्या रणांगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांना मनसेचा सलाम— लक्ष्मण कोतकर

लोकशाहीच्या रणांगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांना मनसेचा सलाम
शिर्डी शहरातील नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिर्डी शहरातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले आहे. मतदारांचा कौल मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपापल्या परीने जनतेसमोर भूमिका मांडली, प्रश्न उपस्थित केले आणि शहराच्या भवितव्यासाठी मतदारांचा विश्वास मागितला, हे लोकशाहीसाठी अत्यंत सकारात्मक व स्वागतार्ह असल्याचे मनसेने म्हटले आहे.
निवडणूक लढवली नाही, पण शिर्डीच्या भविष्यावर मनसेची नजर ठाम
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिर्डी शहराने निवडणूक लढवली नसली, तरी शिर्डी शहराचा विकास, प्रगती, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हेच मनसेचे केंद्रबिंदू राहिले आहेत. सत्ता कोणाचीही असो, मात्र शहराच्या हिताच्या मुद्द्यांवर मनसेची भूमिका ठाम, स्पष्ट आणि आक्रमक राहणार असल्याचे शिर्डी शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. शिर्डी हे केवळ धार्मिक शहर नसून, नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि विकासाभिमुख शहर झाले पाहिजे, हीच मनसेची भूमिका असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले.
जिंकणाऱ्यांना इशारा, लोकशाही केवळ सत्ता नाही तर जबाबदारी
उद्या होणाऱ्या मतमोजणीत काही उमेदवार विजयी होतील, तर काहींना पराभवाचा सामना करावा लागेल. मात्र लोकशाहीत निवडणूक जिंकणे किंवा हारणे हा अंतिम निकष नसून, जनतेचा विश्वास आणि जनतेशी प्रामाणिक राहणे हेच खरे मोजमाप असल्याचे मनसेने ठणकावून सांगितले आहे. निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सत्तेचा माज न करता, भ्रष्टाचार, गटबाजी आणि स्वार्थी राजकारणाला थारा न देता, शिर्डी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि उत्तरदायी कारभार करावा, अन्यथा जनतेसोबत मनसे रस्त्यावर उतरेल, असा सूचक इशाराही देण्यात आला आहे.
पराभव म्हणजे शेवट नाही; संघर्षातूनच खरा नेता घडतो
यावेळी निवडून न येणाऱ्या उमेदवारांनी खचून न जाता, हा पराभव अनुभव म्हणून स्वीकारून अधिक ताकदीने जनतेच्या प्रश्नांसाठी झटत राहावे, असे आवाहन मनसेने केले आहे. जनसेवेचा प्रवास हा निवडणुकीपुरता मर्यादित नसतो, तर तो अखंड चालणारा संघर्ष असतो. पाणी, रस्ते, स्वच्छता, नागरी सुविधा, रोजगार आणि कायदा-सुव्यवस्था यांसारख्या प्रश्नांवर सातत्याने लढणारेच खरे लोकनेते ठरतात, असेही मनसेने स्पष्ट केले आहे.
शिर्डीच्या विकासासाठी मनसे सज्ज; जनतेसोबत संघर्ष अटळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिर्डी शहरातर्फे निवडून येणाऱ्या व न येणाऱ्या सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या असून, शिर्डी शहराचा सर्वांगीण विकास, सामाजिक सलोखा, शांतता आणि एकोपा कायम राहावा, हीच सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे. शहराच्या प्रश्नांवर गप्प बसणार नाही, गरज पडल्यास आंदोलन, संघर्ष आणि रस्त्यावर उतरून जनतेच्या हक्कासाठी लढा दिला जाईल, असा ठाम निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
— लक्ष्मण कोतकर
शहराध्यक्ष,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिर्डी

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button