Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — शिक्षित नेतृत्वाला मिळतायत प्रचंड पाठिंबा

प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — शिक्षित नेतृत्वाला मिळतायत प्रचंड पाठिंबा

sai nirman
जाहिरात

………..: शिर्डी :
आगामी शिर्डी नगरपरिषद निवडणूक 2025 तोंडावर असताना प्रभाग क्र. १ ब मध्ये वातावरण चांगलेच तापले असून मतदारांमध्ये एकच नाव जोरदार चर्चेत आहे — अॅड. प्रतिक राजेंद्र शेळके.

साईंच्या आशीर्वादाने विकासाची नवी वाट निर्माण करण्याचे स्वप्न घेऊन उभे ठाकलेले अपक्ष अधिकृत उमेदवार अ. क्र. ३, बॅट चिन्ह असलेले अॅड. प्रतिक शेळके हे सुशिक्षित, अभ्यासू, शांत स्वभावाचे आणि प्रभागातील प्रत्येक समस्येची जाण असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत.

DN SPORTS

नागरिकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी “परीवर्तनाचे साक्षिदार होऊया” हा संदेश देत अॅड. शेळके प्रचारात मोठ्या जोमाने उतरले आहेत. रस्ते, पाणी, नाली, स्वच्छता, लाईट, नागरिक सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांनी केलेले काम आणि पुढील पाच वर्षांचे स्पष्ट विकास आराखडे मतदारांच्या पसंतीस पडत आहेत.

प्रभागातील अनेक नागरिकांनी स्पष्टपणे व्यक्त केले आहे की, यावेळी शिक्षण, प्रामाणिकपणा आणि जिद्द असलेल्या नेतृत्वालाच संधी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रभाग क्र. १ ब मध्ये अॅड. प्रतिक शेळके यांच्याविषयी उत्साहाचे वातावरण असून मतदानाच्या दिवशी ‘बॅट’ चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करूया, असा एकमुखी संदेश मतदार देताना दिसत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button