Letest News
राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!
अ.नगरक्राईम

समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्ये खळबळ

मता पतसंस्थेशी संबंधित कथित बनावट खातेप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) तपासाची व्याप्ती वाढवत असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणात अशोक खरात याचा ताबा एसआयटी लवकरच घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान एका परिवहन विभागातील अधिकाऱ्यासह त्यांच्या कुटुंबातील चार जणांची चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच संबंधित व्यक्तींच्या सहीचे नमुने घेऊन आवश्यक पंचनामा करण्यात आल्याचीही चर्चा आहे.
या कथित प्रकरणात सुमारे १०० बनावट खाती उघडण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्या अनुषंगाने आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि संबंधित नोंदींची तपासणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, तपास यंत्रणेकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणातील सर्व बाबींचा अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणात पुढे कोणती नवी माहिती समोर येते आणि एसआयटीची पुढील कारवाई काय असते, याकडे संबंधितांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button