शिर्डी प्रतिनिधी
सावळीविहीर बु. (ता. राहाता, जि. अहिल्यानगर):
सावळीविहीर ग्रामपंचायतीचा निष्काळजी व बेजबाबदार कारभार दिवसेंदिवस उघड होत आहे.
बाजारतळ परिसरात गेल्या काही महिन्यांत मोबाईल, पर्स, सोन्याचे गंठण, मंगळसूत्र अशा चोरीच्या अनेक घटना घडल्या असून, तरीसुद्धा पंचायत प्रशासन बेदरकारपणे हातावर हात ठेवून बसले आहे.
शेतकऱ्याचा आयफोन 14 चोरीला — पोलिसात तक्रार दाखल
शेतकरी अरविंद धिवर हे गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बाजारतळ सावळीविहीर बु येथे भाजीपाला खरेदीसाठी गेले असता, त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशातून ₹40,000 किंमतीचा आयफोन 14 (पांढरा रंग) अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
याबाबत त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात प्रथम खबर क्र. 0935/2025 अन्वये कलम 303(2), भारतीय न्याय संहिता (BNS 2023) अंतर्गत फिर्याद दिली असून तपास सुरू आहे.
वारंवार चोरी — तरीही ग्रामपंचायतीकडून ‘शून्य’ उपाययोजना
नागरिकांचा संताप ओसंडून वाहत आहे.
“बाजारात मोबाईल, पर्स, सोन्याचे दागिने, मंगळसूत्र — सगळं काही चोरट्यांच्या हाती लागतंय!
पण ग्रामपंचायत मात्र पावत्या वसूल करण्यातच व्यस्त आहे.
सुरक्षा व्यवस्था नाही, सीसीटीव्ही नाही, आणि कोणतेही जबाबदार अधिकारी दिसत नाहीत!”
असा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
गेल्या काही बाजारांमध्ये अशा चोरीच्या घटनांची मालिका सुरू असून, ग्रामपंचायतीने एकदाही चौकशी, पहारा व्यवस्था किंवा सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची तसदी घेतलेली नाही.
पंचायत झोपेत — नागरिक भयभीत!
दर आठवड्याला हजारो लोक बाजारात गर्दी करत असतात, परंतु पोलिसांचा बंदोबस्त नाही, ग्रामपंचायतीकडून कोणताही सुरक्षारक्षक नाही.
चोरट्यांना हवे तसं वातावरण तयार झालं आहे आणि सामान्य नागरिक भीतीने बाजारात जात आहेत.
“आम्ही दर आठवड्याला बाजारात जातो, पण मनात भीती असते — मोबाईल, पर्स, सोन्याचे दागिने सुरक्षित राहतील का?”
असा प्रश्न प्रत्येक नागरिक विचारत आहे.
अशोकराव आगलावेंचा इशारा
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
जर पंचायत प्रशासनाने पुढील बाजारापूर्वी सुरक्षेची ठोस व्यवस्था केली नाही, तर ग्रामपंचायतीसमोर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
मुख्य मागण्या
- बाजार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसवावेत
- प्रत्येक बाजार दिवशी सुरक्षारक्षक नेमावेत
- बाजार शुल्कातून सुरक्षा निधी राखावा
वारंवार चोरीच्या घटनांचा तपास गतीमान करून दोषींना शिक्षा द्याव
“सुरक्षा नाही, जबाबदारी नाही — मग पावत्या कशा नागरिकांचा थेट सवाल —
“ग्रामपंचायतीने बाजारातून लाखो रुपये महसूल वसूल केला, पण सुरक्षा शून्य!
मग या पावत्या फक्त महसूल गोळा करण्यासाठी आहेत का, की नागरिकांच्या सेवेसाठी?”
सावळीविहीर ग्रामपंचायतीने आता जागं व्हावं — नाहीतर ग्रामस्थांचा रोष भडकणार आहे!

