Letest News
शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका! शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्...
अ.नगरक्राईम

ओला यांची बदली हा जरी प्रशासनिक भाग असला तरी ! केलेल्या पापाची शिक्षा मिळणार शेवटी अहिल्यानगर कोर्टा दारी !!

शिर्डी (प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यात आल्यापासून जिल्ह्यात वेगवेगळ्या कु कारणाने गाजलेले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची अखेर बदली झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक  ओला यांची कारकीर्द मात्र अहिल्यानगर च्या इतिहासात सर्वात बोगस अशी राहिल्याचे नागरिकांकडून, जिल्हावासिंयाकडून  आता बोलले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

ते जिल्हा पोलीस अधीक्षक असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणी बोलत नव्हते मात्र बदली होताच जिल्ह्यातून त्यांच्या खराब कारकिर्तीच्या विषयी आता चर्चा होत आहेत.राकेश ओला हे जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, अवैध धंदे नियंत्रणात येथील अशी जिल्हा वाशियांना अपेक्षा होती.

मात्र तसे झाले नाही. उलट जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली. लाचखोरी वाढली त्यास नियंत्रण करण्यासाठी राकेश ओला कमी पडले होते. जिल्ह्यामध्ये मटका, जुगार ,अवैध दारू विक्री, अवैध वेश्या व्यवसाय ,अवैध प्रवासी वाहतूक, त्यांच्या काळात आणखी वाढली . शरमेची बाब म्हणजे दक्षिण नगरचे खासदार निलेश लंके यांनी जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली पोलीस हफ्ते घेतात म्हणून राकेश ओला यांच्या कालावधीतच अहिल्यानगरच्या एस पी कार्यालयासमोर उपोषण करावे लागले होते.

त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची सर्वत्र थूथु झाली होती. तरीही जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती व अवैध धंदे नियंत्रणात आले नाही. जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी तसेच शनिशिंगणापूर तसेच विविध तीर्थस्थाने, जिल्ह्यातील शहरे येथेही गुन्हेगारी कमी होण्याच्या ऐवजी वाढत गेली. मात्र एखादा दुसरा छापा टाकून मोठा गाजा वाजा करण्यात येत होता. खालचे काही प्रामाणिक पोलीस अधिकारी चांगले कर्तव्य बजावत होते .

मात्र अशा पोलीस अधिकाऱ्यांचे नाव पुढे कधी आणले नाही.मात्र  हे जिल्हा पोलीस अधीक्षक आपलाच गवगवा करताना दिसत होते. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शहरात काही वर्षांपूर्वी  झालेल्या दुहेरी हत्याकांडात एका कुविख्यात गुंडाविरोधात  साक्षीदार म्हणून त्या काळातील सिंघम समजले जाणारे कर्तव्यदक्ष असे जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांना सामाजिक भान ठेवून कुणीही साक्षीदार होत नसताना जे साक्षीदार झाले .

व या कुविख्यात गुंडांना जेलमध्ये धांडण्याचे काम तत्कालीन कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी त्यामुळे केले होते. त्यानंतर त्या साक्षीदाराला न्यायालयाने दिलेले संरक्षण  या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जाणीवपूर्वक काढले. त्यांची रिव्हॉल्वर बेकायदेशीर हिसकावून घेतली  आणि आपल्या मर्जीतल्या काही बोगस लोकांना पोलीस संरक्षण दिले. हा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला होता.

असे आपल्या मर्जीप्रमाणे वागणारे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बदली आता झाली आहे. प्रशासकीय बदली असली तरी व ते कुठे गेले तरी त्यांनी जिल्ह्यामध्ये असताना आपल्या अधिकाराचा गैरवापर करत एका प्रकरणात महिला व मुलींनाही त्रास दिला. त्यांच्या विरोधात अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात गुन्हा दाखल होण्यासाठी दावा दाखल आहे. एका पीडित महिलेने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांवर गुन्हा जिल्हा न्यायालयात दाखल केल्यानंतर मोठी चर्चा जिल्ह्यामध्ये झाली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षकांची त्यामुळे मोठी नाच्चक्कीही झाली होती. त्यांनी साम दाम दंड भेद असे अनेक प्रयत्न केलेत कि हि याचिका मागारी घ्यावी परंतु अर्जदार महिलेने प्रण घेतले आहे कि जोपर्यंत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची सजा ह्या एस पी आणि पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व इतर पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत लढा सुरु राहील साई के नगरीने देर है अंधेरी नही आता ओला त्यांची बदली झाली आहे.

बदली झाली असली तरी ते कुठेही गेले तरी त्यांनी त्या महिलेवर व त्यांच्या मुलींवर केलेल्या अत्याचाराचा पाप फेडण्यासाठी यावेच लागणार आहे   असे त्यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात दावा दाखल करणाऱ्या महिलेने म्हटले असून आपण जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व पोलीस निरिक्षक दिनेश आहेर आणि अत्याचार करणारे पोलीस  यांनी जो आम्हाला विनाकारण त्रास दिला.

त्यामुळे त्यांना त्याचा जाब कोर्टात द्यावाच लागणार असून जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयाचे खंडपीठ किंवा सुप्रीम कोर्टातही आम्हाला त्यासाठी जावे लागले तरी जाणार! पण या आपल्या अधिकाऱ्याचा गैरवापर करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक ओला व संबंधित पोलिसांना  त्यांच्या कृत्याची सजा दिल्याशिवाय राहणार नाही.

तसा आपण प्रणं केला असल्याचेही एस पी राकेश ओला  दिनेश आहेर आणि त्यापोलीस यांच्यावर जिल्हा न्यायालयात गुन्हा दाखल करणाऱ्या या  महिलेकडून  बोलले जात आहे. कारण हा भारत देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधान व कायद्यावर चालतो. या कायद्या पुढे कुणीही मोठा नाही.

ज्याने कायदा मोडला त्याला सजा होणारच. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक हे जरी अहिल्यानगर वरून बदली होऊन मुंबईला गेले तरी त्यांना आपल्या गैरवर्तनाचा चा अहिल्यानगरला येऊन जाब जिल्हा न्यायालयात  द्यावा लागणार आहे. त्यांची कारकीर्द मोठी खराब राहिली आहे. त्यांचा सारख्या अधिकाऱ्यामुळे पोलिसांची व आहिल्यानगर जिल्ह्याची प्रतिमा मालिन झालेली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button