Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरराजकीय

विखे कुटुंब जर पन्नास वर्ष सत्तेत आहे तर त्यांना दरोदार मतांचा जोगवा मागण्याची वेळ का? – श्रीकांत मापारी

गणेशनगर (प्रतिनीधी): स्वतःचा स्वाभिमान कधीही गहाण न ठेवणारा, आपला स्वतंत्र विचार जपणारा, कधीही कुणाला न जुमानणारा गणेश परीसर असल्याने विखे त्याच्या मुळावर उठले असल्याची प्रतिक्रिया श्रीकांत मापारी यांनी दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

गणेश चा सहकार कायम स्वाभिमानी राहिला तो कायम विखेंना डोकेदुखी ठरला म्हणून सन २००९ ला या परिसरावर पहिला हातोंडा विखेंनी मारला मतदारसंघाची पुनर्रचना करताना गणेश परिसरातील वाकडी व पुणतांबे परिसरातील ११ गावांचा समावेश शिर्डी ऐवजी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात केला आणि गणेश परिसराचा आपल्या सोईच्या राजकारणासाठी कायमचा तुकडा केला.

ते एवढ्या वरचं थांबले नाही त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा श्री गणेश सहकारी साखर कारखान्याकडं वळवला पहिले त्यांनी गणेश च्या कार्यक्षेत्रातील ऊस प्रवरेला पळवला ऊस पळवुन ही कारखाना सुरुचं राहतो म्हणल्यावर त्यांनी आपला मोर्चा गोदावरी उजवा कालव्याकडं वळवला सत्तेचा गैरवापर करुन पाटपाण्याचं नियोजन कोलमडून टाकले गणेश परिसरातील ऊस, मोठ्या प्रमाणावर असलेली पेरु शेती संपवुन गणेश परिसरातील शेतकरी कायमचा देशोधडीला लावला

त्यानंतर त्यांनी सरकार मधील आपल्या मंत्रीपदाचा वापर करुन श्री गणेश सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळवला तो कारखाना ८ वर्ष प्रवरेच्या पारतंत्र्यात ठेवला त्यानंतर तो कारखाना कायमचा गिळण्याचा प्रयत्न विखेंनी केली मात्र सभासद व शेतकर्‍यांनी हा विखेंचा प्लॅन हाणून पाडला तो कारखाना विखेंच्या ताब्यातुन काढुन घेऊन पुन्हा लोकनेते थोरात साहेब व युवानेते भैय्यासाहेब यांच्या परिवर्तन मंडळाच्या ताब्यात मोठ्या विश्वासाने दिला.

तो सभासद व शेतकर्‍यांचा विश्वास सार्थ ठरवत थोरात साहेब व भैय्यासाहेब यांनी यशस्वी गळीत हंगाम संपन्न केला एवढेचं नव्हे तर जिल्हा एक नंबर रिकव्हरी देणारा गणेश पहिला तर गणेश इतिहासात पहिल्यांदाच उच्चांकी ३००० रु प्रती टन भाव कारखान्याने दिला. सभासद व उस उत्पादक यांना दिवाळीला मोफत साखर देण्याचा विक्रम ही गणेश ने केला.

हे सर्व झाल्यानंतर सत्तेचा गैरवापर करुन गणेश अडचणीत आणण्याचा मोठा प्रयत्न विखेंनी केला सहकार आयुक्तांपासुन ते सर्वच्य न्यायालयापर्यंत कोर्ट कचेरी केल्या जिल्हा बैकेच्या कर्जात आडकाठ्या आणल्या मात्र गणेश परिसरातील सभासद व उस उत्पादक, शेतकरी यांनी मोठा संयम धरला हा गणेश परीसरात व गणेश कारखाना कायमचा उध्वस्त कसा करता येईल याचा प्रयत्न विखेंनी कायम केला गणेश च्या मुळावर कायम घाव घातला मात्र त्याला जागृत संकटमोचक श्री गणेश कायम आडवा आला अशी भावना जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी व्यक्त केली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button