Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
Blog

शहीद जवान व पोलीस बांधवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेलापुरात एक पणती जवानासाठी उपक्रम संपन्न..!

बेलापुर प्रतिनिधी:
आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेले जवान व पोलीस बांधवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फ्रेंडस् फाँर ऐव्हर गृप व समस्त बेलापुर-ऐनतपूर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथील विजय स्तंभ चौक येथे एक पणती जवानांसाठी- दीपोत्सव २०२३ हा उपक्रम राबविण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


फ्रेंडस् फाँर ऐव्हर गृप व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने सन २०१४ पासून दिपावली पाडव्याच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात येतो. हे या उपक्रमाचे १० वे वर्ष होते.सैन्य दलात कार्यरत असलेले मेजर दिनेश वाघ, मेजर निलेश अमोलिक, मेजर मुकुंद कुटे, माजी सैनिक देविदास देसाई, शरद देशपांडे,सुजित शेलार तसेच बेलापूर पोलीस औट पोस्ट चे रामेश्वर ढोकणे, बडे,हरीश पानसंबळ आदीच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपक्रमासास सुरुवात करण्यात आली. या नंतर उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या हस्ते पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या.

भारत भारत माता की जय,वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे या घोषणानी परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी शहीद जवान व पोलीस बांधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप चे अभिषेक खंडागळे,अँड. मयुर साळुंके, विष्णुकांत लखोटीया, जयेंद्र खटोड, राजेश सूर्यवंशी,सुभाष शेलार,ऋतुराज नाईक,विजय कोठारी,वेणूगोपाल सोमाणी, निशिकांत लखोटिया,प्रभात कुऱ्हे,साईनाथ शिरसाठ,सुमित सोमाणी,राम कुऱ्हे,सुभाष शेलार,महंत काळे,महेश कुऱ्हे, विशाल आंबेकर, सोमनाथ साळुंके, राहुल माळवदे आदींनी परिश्रम घेतले.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button