Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
Blog

पोलीस स्टेशनच्या जेलमधून चार आरोपींनी केले पलायन!

शिर्डी (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच असणाऱ्या जेलमधील चार आरोपींनी जेलचे गज तोडून पलायन केल्याची घटना पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. ‌जेलधील कैदी पळून गेल्याने पोलिसांची पळापळ झाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहेत. कारागृहातून कैदी पळाल्याने संगमनेर जेल प्रशासनाची इज्जत पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच उपकारागृह बांधण्यात आलेले आहे. या कारागृहामध्ये तीन बराकी आहेत. या जेलमध्ये २४ कैद्यांची क्षमता असतानाही अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त कैदी या जेलमध्ये ठेवलेले असतात. या कारागृहामध्ये कैद्यांना गुटखा, तंबाखू, बाहेरचे जेवण, मोबाईल आधी सुविधा सहज उपलब्ध होत असल्याने संगमनेरचे कारागृह नेहमी चर्चेचा विषय असते. जेलच्या बंदोबस्तावर असणारे पोलीस व कैदी यांच्यात होणारे वाद विवाद यामुळे हे कारागृह वादग्रस्त ठरले आहे.


संगमनेच्या कारागृह सध्या अनेक कैदी शिक्षा भोगत आहे. काल रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. हे कर्मचारी बंदोबस्तात असतानाही कैदी जेलचे गज कापून पळून जाण्यासाठी यशस्वी ठरले. या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा ददेल, अनिल काळे हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या आरोपींनी जेलमधून पळ काढला. बंदोबस्तावरील पोलिसांचे दुर्लक्ष व्हावे यासाठी जेलमध्ये मोठ मोठ्याने गाणे आरत्या सुरू होत्या. या गोंधळात या चौघांनी जेलचे गज तोडले. ठरल्याप्रमाणे बाहेर एक कार अगोदरच येऊन थांबलेली होती. जेल तोडून हे कैदी या कार मध्ये बसून पसार झाले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. संगमनेर पोलीस या फरार झालेल्या कायद्यांचा शोध घेत आहेत. विविध पथके त्यासाठी तयार करण्यात आली असून वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आले आहेत.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button