Letest News
राहता पोलीस ठाण्यात कायदा झोपला होता का?” — निष्क्रिय पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कारभारावर ... ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशव्यापी बंद- जिल्ह्यातील सर्व केमिस्टनी बंदमध्ये सहभागी व्हावे... भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले; दत्ता कराळे यांची बदली-खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळ... “ओडीसाच्या साईभक्तेकडून साईचरणी सुवर्ण अर्पण ७.५६ लाखांचे आकर्षक सोन्याचे ब्रोच भेट” गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश...
Blog

शिर्डीतील आठवडे बाजारात सायंकाळी दोन गटात हाणामारी! मर्डर झाल्याच्या अफवेने काही काळ बाजारात घबराट!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीतील आठवडे बाजार परिसरात काल सायंकाळी दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असून ऐन आठवडे बाजारात मोठी धावपळ सुरू असताना, व मोठ्या प्रमाणात महिला वर्गाची दिवाळी सण जवळ आल्याने भाजी आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडालेली असतानाच बाजारतळ परिसरात पिंपळवाडी शिवारात राहणाऱ्या अजय पवार या तरुणाने थेट कटरने गळ्यावर वार करत एका तरुणास गंभीर जखमी केले व किशोर पवार नामक तरुणाने जखमी अवस्थेत मान फाकवल्याने सतीश पिंपळे हा गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच अचानक थेट मर्डर झाल्याची अफवा शिर्डीत पसरल्याने या घटनेची मोठी चर्चा झाली. त्यामुळे बाजारातही काही काळ घबराट निर्माण झाली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


याबाबत सुमन सतीश पिंपळे यांनी शिर्डी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून शिर्डी पोलिस स्टेशनला याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर 1023/2023 नुसार भादवी कलम 307,323,504,506,34 प्रमाणे एका महिलेसह चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

kamlakar


घडलेली घटना अशी की, सतीश पिंपळे हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची गुजराण करतात आरोपी किशोर प्रेमराज पवार आणि अजय प्रेमराज पवार हे पिंपळवाडी शिवार येथे राहण्यास असून नात्याने सतीश पिंपळे यांचे भाचे आहेत. तर अर्जुन पोपट पवार हा चुलत भाचा आहे. दरम्यान किशोर पवार याचे आपली मेहुणी अनिता राजेश चव्हाण हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे सतीश पिंपळे याने सांगितल्याची शंका किशोर यास असल्याने तो राग सतिषवर होता याबाबत जाब विचारण्यासाठी अजय पवार,किशोर पवार,अनिता चव्हाण व अर्जुन पवार यांनी सतीश पिंपळे यांचे बाजारतळ येथे राहणारे नातेवाईक मच्छिंद्र काळे यांच्या घराजवळ सतीश पिंपळे यास बोलावले आणि प्रेम संबंधाबाबत नवऱ्याला का सांगितले म्हणत या सगळ्यांमध्ये वाद झाला व यातूनच अजय पवार याने थेट कटरने सतीश पिंपळे याच्या गळ्यावर वार करत जखमी केले आणि किशोर पवार याने त्याच स्थितीत जखमी सतीश याची मान फाकवत आणखी जखमी केले.


शिर्डी पोलिस स्टेशनला याबाबत माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणास रुग्णवाहिकेत साईबाबा हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल केले असून खोलवर जखम झाल्याने तरुणाची प्रकृती चिंताजनक असून शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील,सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या सह पोलिस नाईक वाळके पोलिस नाईक पवार,पोलिस नाईक खेडकर, अविनाश मकासरे यांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोघा आरोपींना जेरबंद केले असून पुढील तपास शिर्डी पोलिस करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button