Letest News
शेजाऱ्याच्या कुंपणाचा दाखला देणाऱ्या सुजय विखेंनी जनतेच्या प्रश्नांच्या कुंपणात अडकू नये टीकेला उत्त... १५ वर्षांच्या शोषणाचा गंभीर आरोप-माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यावर बलात्काराचा गुन्... शिवसेनेच्या पदाधिकारी निवडीसाठी २३ व २४ नोव्हेंबरला मुलाखती जिल्हा प्रमुख कमलाकर कोते मला सहा महिन्यांसाठी गृहमंत्री करा-सगळ्यांच्या बत्त्या गुल करतो!” श्री द्वारकामाईत तुळशी-विष्णू विवाहाचा मंगल सोहळा भक्तिभावात संपन्न! रोग्य केंद्रात औषधांचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे काय? शिर्डीत ७० व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ! शाम जमन गिरि गोस्वामी यांची अखिल भारतीय गोस्वामी समाजाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती! शिर्डीत प्रामाणिकपणाचे पुन्हा एकदा दर्शन! अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नवनियुक्त सीईओंची शिर्डीत सदिच्छा भेट!
अ.नगरक्राईम

१५ वर्षांच्या शोषणाचा गंभीर आरोप-माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल!

मी आमदार होणार, तुझे भले करतो’ असे आमिष दाखविल्याचा महिलेचा आरोप; डॉ. संजय म्हस्के, डॉ. अनंत शेकोकर यांचाही गुन्ह्यात समावेश

sai nirman
जाहिरात

अहिल्यानगर | प्रतिनिधी

राजकीय पद, प्रभाव आणि आमदारकीची स्वप्ने दाखवून एखाद्या महिलेच्या आयुष्याशी तब्बल १५ वर्षे खेळले गेले का? राजकारणातील प्रतिष्ठेच्या आड महिलांचे शोषण होत असेल, तर अशा प्रवृत्तींना अभय कोणाचे? असे गंभीर प्रश्न उपस्थित करणारे प्रकरण श्रीरामपूरमध्ये समोर आले आहे.

DN SPORTS

अहिल्यानगर जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्याविरुद्ध एका महिलेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डॉ. संजय म्हस्के, डॉ. अनंत शेकोकर आणि अन्य संबंधितांची नावेही गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

kamlakar

आमदारकीचे स्वप्न दाखवून १२ ते १५ वर्षे शोषण केल्याचा आरोप!

पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, रावसाहेब खेवरे यांनी राजकीय प्रभावाचा वापर करून ‘मी आमदार होणार, तुझे भले करतो’ असे सांगत लग्नाचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. या आश्वासनाच्या आधारे तब्बल १२ ते १५ वर्षे वेळोवेळी शारीरिक शोषण केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी अत्याचार केल्याचा, गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास भाग पाडल्याचा तसेच सात ते आठ वेळा गर्भपात केल्याचा धक्कादायक आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

डॉक्टरांच्या भूमिकेचीही पोलिसांकडून चौकशी अपेक्षित!

या प्रकरणात संबंधित डॉक्टरांनी मदत केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यामुळे डॉ. संजय म्हस्के आणि डॉ. अनंत शेकोकर यांच्यासह अन्य संबंधितांची नावेही गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकरणातील प्रत्येक व्यक्तीची भूमिका, कथित घटनांचे पुरावे आणि वैद्यकीय नोंदी यांची सखोल चौकशी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राजकीय प्रतिष्ठा मोठी की महिलेचा सन्मान?

राजकारणात पद, प्रतिष्ठा आणि सत्ता मिळविण्यासाठी धडपडणाऱ्यांनी सर्वप्रथम महिलांच्या सन्मानाची जाणीव ठेवली पाहिजे. एखादी महिला तब्बल १५ वर्षांच्या शोषणाची तक्रार घेऊन पोलिसांपर्यंत पोहोचत असेल, तर त्या तक्रारीकडे केवळ राजकीय चष्म्यातून न पाहता निष्पक्ष आणि पारदर्शक तपास होणे गरजेचे आहे.

आता प्रश्न एकच — या गंभीर प्रकरणाचा तपास किती खोलवर जाणार आणि सत्य बाहेर येणार कधी?

या प्रकरणातील सर्व आरोपांची न्यायालयीन प्रक्रियेत पडताळणी होणे बाकी असून, संबंधितांची बाजू आणि पोलिस तपासातून समोर येणारे निष्कर्षही महत्त्वाचे ठरणार आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button