Letest News
मला सहा महिन्यांसाठी गृहमंत्री करा-सगळ्यांच्या बत्त्या गुल करतो!” श्री द्वारकामाईत तुळशी-विष्णू विवाहाचा मंगल सोहळा भक्तिभावात संपन्न! रोग्य केंद्रात औषधांचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे काय? शिर्डीत ७० व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ! शाम जमन गिरि गोस्वामी यांची अखिल भारतीय गोस्वामी समाजाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती! शिर्डीत प्रामाणिकपणाचे पुन्हा एकदा दर्शन! अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नवनियुक्त सीईओंची शिर्डीत सदिच्छा भेट! ७५ हजारांच्या सोन्याच्या मंगळसूत्राचा मोह टाळला! तासाला अवघे ७० रुपये कमावणाऱ्या शिर्डीच्या संतोष मो... उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप तात्पुरता स्थगित! जिल्ह्यातील पाच गुटखा विक्रेत्यांवर एलसीबीचे छापे! मग बड्या कथित पुरवठादारांना अभय कोणाचे?
अ.नगरराजकीय

मला सहा महिन्यांसाठी गृहमंत्री करा-सगळ्यांच्या बत्त्या गुल करतो!”

अहिल्यानगर | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

“आमच्या जिल्ह्यात पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मोठे आहे. सत्ता आहे म्हणून कुणी गुन्हे दाखल करायला लावत असेल; मात्र काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत. जिल्हा बँकेत गेलो म्हणून काय झाले? गेटवर चौकीदार उभा राहिलो आहे, असे समजू नका. नियम मला सगळे माहिती आहेत. माझ्या कपड्यांवर जाऊ नका!” अशा तिखट शब्दांत अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी विखे पिता-पुत्रांना लक्ष्य करीत जोरदार राजकीय फटकेबाजी केली.

“महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर मला सहा महिन्यांसाठी गृहमंत्री करा. ते शक्य नसेल तर नगर जिल्ह्याचा पालकमंत्री करा. सगळ्यांच्या बत्त्या गुल केल्या नाहीत तर बोला,” असे थेट आव्हान देत लंके यांनी आगामी राजकारणाचे संकेत दिले.

DN SPORTS

kamlakar

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या सन २०२६ मधील निवडणुकीत संचालकपदी निवड झाल्याबद्दल खासदार नीलेश लंके यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा

ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लंके यांनी आजूबाजूच्या तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागाची पाहणीही केली. सत्काराला उत्तर देताना त्यांनी केलेल्या भाषणाने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

खोट्या गुन्ह्यांचा मुद्दा ऐरणीवर; पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

खासदार लंके म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यात खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. हे गुन्हे कसे दाखल होतात, त्यामागे कोणाची भूमिका असते आणि कोणाच्या सांगण्यावरून कारवाई केली जाते, हे सर्वांना माहिती आहे. सत्तेचा वापर करून विरोधकांना अडचणीत आणण्याचे प्रकार होत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

“जिल्हा बँकेत गेलो म्हणून गेटवरचा चौकीदार समजू नका!”

विखे पिता-पुत्रांना उद्देशून केलेल्या वक्तव्याने सभेत विशेष लक्ष वेधले. “काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत,” असा टोला लगावत त्यांनी आपल्या कपड्यांवरून किंवा साध्या राहणीमानावरून आपली ताकद ठरवू नये, असे ठणकावून सांगितले. जिल्हा बँकेतील संचालकपदाचा उल्लेख करीत त्यांनी विरोधकांना सूचक इशाराही दिला.

“मंत्री करा, मग माझा हिसका दाखवतो!”

भाषणातील सर्वाधिक चर्चेचा ठरलेला भाग म्हणजे लंके यांची गृहमंत्रीपदाची मागणी. “महाविकास आघाडीचे सरकार आले तर मला सहा महिन्यांसाठी गृहमंत्री करा. ते नाही जमले तर नगर जिल्ह्याचा पालकमंत्री करा. फक्त गाड्यांचा ताफा घेऊन नगरवरून शिर्डीला जातो. माझ्यासोबत काही अधिकारी ठेवा. तुम्ही म्हणाल तर येताना एसटीनेही येतो; पण मंत्री झाल्यानंतर सगळ्यांच्या बत्त्या गुल केल्या नाहीत तर बोला,” असे आव्हान त्यांनी दिले.

खासदार नीलेश लंके यांच्या या आक्रमक भाषणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. विशेषतः विखे पिता-पुत्रांना उद्देशून केलेली टीका आणि गृहमंत्रीपदाबाबत केलेले विधान यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दैनिक साईदर्शनचा सवाल : खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा खासदारांचा दावा गंभीर असेल, तर या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होणार का?

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button