कोल्हार | प्रतिनिधी

अखिल भारतीय गोस्वामी समाज (रजिस्टर्ड) या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोल्हार येथील शामभाऊ जमन गिरि गोस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोरंजन गिरि यांनी ही नियुक्ती जाहीर करून त्यांचे अभिनंदन केले आहे.
शामभाऊ गोस्वामी यांना सामाजिक कार्याचा अनुभव, समाजाप्रती असलेली बांधिलकी, संघटनात्मक क्षमता आणि नेतृत्वगुण यांच्या जोरावर महाराष्ट्रात संघटनेला नवी दिशा व बळकटी मिळेल, असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.
गोस्वामी समाजाची एकजूट, राजकीय क्षेत्रातील प्रभावी सहभाग, शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक सन्मान यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी कार्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेशात संघटनेचा विस्तार करून गोस्वामी समाजाचा आवाज अधिक बुलंद करण्याची जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
या नियुक्तीमुळे कोल्हारसह परिसरातील गोस्वामी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शामभाऊ गोस्वामी यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांचा कार्यकाळ यशस्वी, समाजहिताचा आणि ऐतिहासिक ठरो, अशा शुभेच्छा देण्यात येत आहेत.