Letest News
मला सहा महिन्यांसाठी गृहमंत्री करा-सगळ्यांच्या बत्त्या गुल करतो!” श्री द्वारकामाईत तुळशी-विष्णू विवाहाचा मंगल सोहळा भक्तिभावात संपन्न! रोग्य केंद्रात औषधांचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे काय? शिर्डीत ७० व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ! शाम जमन गिरि गोस्वामी यांची अखिल भारतीय गोस्वामी समाजाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती! शिर्डीत प्रामाणिकपणाचे पुन्हा एकदा दर्शन! अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नवनियुक्त सीईओंची शिर्डीत सदिच्छा भेट! ७५ हजारांच्या सोन्याच्या मंगळसूत्राचा मोह टाळला! तासाला अवघे ७० रुपये कमावणाऱ्या शिर्डीच्या संतोष मो... उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप तात्पुरता स्थगित! जिल्ह्यातील पाच गुटखा विक्रेत्यांवर एलसीबीचे छापे! मग बड्या कथित पुरवठादारांना अभय कोणाचे?
राजकीयशिर्डी

शिर्डीत प्रामाणिकपणाचे पुन्हा एकदा दर्शन!





शिर्डी | प्रतिनिधी

श्री साईबाबांच्या पावन शिर्डी नगरीत माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाची परंपरा आजही जिवंत असल्याचे पुन्हा एकदा दोन घटनांमधून अधोरेखित झाले आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हरवलेल्या पैशांची आणि वस्तूंची सुरक्षितपणे परतफेड करून संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह स्थानिक रिक्षाचालकांनी प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

श्री साईबाबा संस्थानच्या नवीन दर्शन इमारतीतील कंत्राटी सुरक्षा कर्मचारी श्री. रमेश बकाल यांना गेट क्रमांक ६ येथील पेड काउंटरजवळ एक छोटी पर्स आढळून आली. या पर्समध्ये ९ हजार १६० रुपये रोख रक्कम होती. बकाल यांनी कोणताही विलंब न करता सदर पर्स संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली. पर्समधील माहितीच्या आधारे ती हरियाणा येथील साईभक्त महिला श्रीमती माया लघुट यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना पर्ससह संपूर्ण रोख रक्कम सुरक्षितपणे परत करण्यात आली.

अशाच प्रकारची दुसरी घटना श्री साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक २ समोरील हॉटेल उडुपी एक्सप्रेस येथील धनतारा रिक्षा स्टँडजवळ घडली. येथील रिक्षाचालक बापू बाबुराव राऊत (रा. शिर्डी) यांना एक पाकीट आढळून आले. या पाकिटात ३ हजार ४२० रुपये रोख रक्कम होती. त्यांनीही पैशांचा कोणताही मोह न ठेवता ते पाकीट तातडीने श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केले. त्यांच्या या प्रामाणिक कृतीची दखल घेत त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

पैशांपेक्षा प्रामाणिकपणा मोठा!

विशेष म्हणजे, एका बाजूला संस्थानचा कंत्राटी सुरक्षा कर्मचारी, तर दुसऱ्या बाजूला शिर्डीतील स्थानिक रिक्षाचालक अशा दोन वेगवेगळ्या घटकांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे शिर्डीच्या माणुसकीच्या परंपरेचा प्रत्यय आला आहे. साईभक्तांच्या हरवलेल्या वस्तू आणि पैशांची सुरक्षितपणे परतफेड करण्याची ही भावना केवळ कौतुकास्पद नसून समाजासाठी प्रेरणादायी आहे.

श्री साईबाबांचा 'श्रद्धा आणि सबुरी' हा संदेश केवळ उपदेशापुरता मर्यादित न राहता तो आपल्या आचरणातूनही जपला जात असल्याचे रमेश बकाल आणि बापू बाबुराव राऊत यांच्या कृतीतून दिसून आले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button