Letest News
नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर...
राजकीयशिर्डी

श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर येथील विद्यार्थिनी कु. आकांक्षा दिनेश क्षीरसागर हिने अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ अंतर्गत आयोजित पुणे विभागीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत पुणे विभागातून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. या यशामुळे तिची वर्धा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ अंतर्गत “भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य, संधी आणि आव्हाने” या विषयावर आयोजित वक्तृत्व, तोंडी आणि लेखी अशा तिन्ही स्पर्धात्मक फेऱ्यांमध्ये कु. आकांक्षा हिने उत्कृष्ट सादरीकरण करत आपल्या ज्ञान, वक्तृत्वकौशल्य आणि अभ्यासू वृत्तीची छाप पाडली. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयासह संस्थानच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या यशामध्ये मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती एस. बी. कर्पे आणि मार्गदर्शक शिक्षक श्री ए. एम. बोठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कु. आकांक्षा क्षीरसागर हिच्या या यशाबद्दल संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश शिवाजी कचरे, तदर्थ समिती सदस्य तथा, जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ, मुख्याध्यापिका श्रीमती जहाँआरा सय्यद (मिरजकर) तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत वर्धा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button