Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
खेळसंपादकीय

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी

शिर्डी | प्रतिनिधी
राहाता तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलने दमदार क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवत उल्लेखनीय यश संपादन केले. १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात पात्रता मिळवली आहे. तर १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
राहाता तालुका क्रीडासमिती व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या गटात तब्बल ९८ संघांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेसाठी चार सुसज्ज व्हॉलीबॉल मैदाने उपलब्ध करून देण्यात आली होती. महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच तसेच नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे स्पर्धेला दर्जेदार स्वरूप प्राप्त झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. या विजयामुळे संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुलींच्या संघानेही उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.
या यशामागे क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहोकडे व महादू चांडे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ, प्राचार्या कु. स्वप्ना जगताप, मुख्याध्यापिका शिल्पा पुजारी तसेच सर्व शिक्षकांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button