Letest News
शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार
राजकीयशिर्डी

साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना

शिर्डी | प्रतिनिधी
श्री गणेश चतुर्थीच्या पवित्र आणि मंगलमय मुहूर्तावर श्री साईबाबा समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील साईभक्तांनी श्री साईबाबांच्या चरणी तब्बल ५४ किलो ०६५ ग्रॅम वजनाचा चांदीचा नंदी व बेस, तसेच २२ कॅरेट सोन्याचे शिंग व बिंदी भक्तिभावाने अर्पण केली आहे.
श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबाबत माहिती दिली.
श्री साईबाबा समाधी मंदिरातील श्रींच्या मूर्तीसमोरील जुन्या नंदीचे विधिवत उत्तरपूजन करण्यात आले. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नव्याने अर्पण करण्यात आलेल्या चांदीच्या नंदीची धार्मिक विधीपूर्वक प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


चांदीच्या नंदीची किंमत तब्बल ६० लाखांहून अधिक
आग्रा येथील साईभक्तांनी अर्पण केलेल्या चांदीच्या नंदीचे वजन २७ किलो ०२७ ग्रॅम असून, त्याचे देणगीमूल्य ६० लाख २७ हजार ०२१ रुपये आहे.
नंदीसाठी अर्पण केलेल्या चांदीच्या बेसचे वजन २७ किलो ०३८ ग्रॅम असून, त्याचे देणगीमूल्य ६० लाख २९ हजार ४७४ रुपये आहे.
अशा प्रकारे नंदी व बेसचे एकूण वजन ५४ किलो ०६५ ग्रॅम, तर त्यांचे एकूण देणगीमूल्य तब्बल १ कोटी २० लाख ५६ हजार ४९५ रुपये इतके आहे.
नंदीला सोन्याचा साज; १३.८५ लाखांचे अलंकार
या चांदीच्या नंदीला विशेष धार्मिक व अलंकारिक स्वरूप देण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचे शिंग व सोन्याची बिंदी देखील अर्पण करण्यात आली आहे.
सोन्याच्या शिंगाचे वजन ६९ ग्रॅम ३०० मिलीग्रॅम, तर सोन्याच्या बिंदीचे वजन २९ ग्रॅम ३०० मिलीग्रॅम आहे. दोन्ही सोन्याच्या अलंकारांचे एकूण वजन ९८ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम असून, त्यांचे देणगीमूल्य १३ लाख ८५ हजार १३२ रुपये आहे.


एकूण दानमूल्य १ कोटी ३४ लाखांहून अधिक
चांदीचा नंदी व बेस आणि सोन्याचे अलंकार मिळून या भक्तिभावपूर्ण अर्पणाचे एकूण देणगीमूल्य १ कोटी ३४ लाख ४१ हजार ६२७ रुपये इतके आहे.
आग्रा येथील या साईभक्तांनी यापूर्वीही श्री साईबाबांच्या चरणी विविध स्वरूपातील सोन्या-चांदीच्या वस्तू श्रद्धेने अर्पण केल्या आहेत. साईबाबांवरील अढळ श्रद्धेतून सातत्याने करण्यात येणारे त्यांचे हे योगदान साईभक्तीच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवते.
नाव न सांगता साईचरणी कोट्यवधींची श्रद्धा
विशेष म्हणजे, या साईभक्तांच्या विनंतीवरून त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. प्रसिद्धीपासून दूर राहून साईचरणी अर्पण केलेले हे दान भक्तीतील निस्वार्थ समर्पणाची अनुभूती देणारे ठरले आहे.
साईभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या या अमूल्य दानातून श्री साईबाबांच्या ‘श्रद्धा आणि सबुरी’ या संदेशाची अनुभूती अधिक दृढ होत आहे. भक्ती, समर्पण आणि सेवाभावाची ही अखंड परंपरा साईनगरी शिर्डीत अशीच पुढे सुरू राहो, हीच साईचरणी प्रार्थना.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button