Letest News
सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा...
राजकीयशिर्डी

सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीतील परिचित व्यक्तिमत्त्व डॉ. एकनाथ काका गोंदकर यांचे सुपुत्र सचिन एकनाथ गोंदकर यांचे आज सकाळी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने गोंदकर परिवारासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि शिर्डी शहरावर शोककळा पसरली आहे.
सचिन यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे. अल्पवयातच वडिलांचे छत्र हरपल्याने या चिमुकल्यावर आलेले दुःख मन हेलावून टाकणारे आहे.
सचिन यांच्या निधनाने कुटुंबाचा आधारच हरपला असून, त्यांच्या आठवणी आता कुटुंबीय आणि आप्तेष्टांच्या मनात कायमच्या जिवंत राहतील. अत्यंत दुःखद आणि धक्कादायक अशा या निधनाने शिर्डीकरांमधूनही हळहळ व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सचिन गोंदकर यांच्यावर आज सायंकाळी ६ वाजता शिर्डी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दैनिक साई दर्शन परिवारातर्फे सचिन गोंदकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि गोंदकर परिवाराला हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
शोकाकुल :
डॉ. एकनाथ काका गोंदकर व गोंदकर परिवार, शिर्डी
ॐ शांती! 🙏💐

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button