Letest News
अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्...
क्राईमशिर्डी

शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न!

शिर्डी | प्रतिनिधी रोहन जाधव:

sai nirman
जाहिरात

उपचारासाठी शिर्डीत आलेल्या 75 वर्षीय वृद्ध आणि त्यांच्या नातवाला रिक्षात बसवून मारहाण करत रोख रक्कम लुटल्याच्या धक्कादायक घटनेने शिर्डीच्या कायदा-सुव्यवस्थेसह रिक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 308(6) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असला, तरी या गुन्ह्यामागील संपूर्ण साखळी उघड करणे तितकेच आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
तपासादरम्यान जर एखादी विशिष्ट व्यक्ती आरोपी म्हणून समोर येत असेल, तर केवळ त्याला अटक करून प्रकरण संपविणे पुरेसे ठरणार नाही. त्याच्याकडे रिक्षा कशी आली? ती रिक्षा कोणाच्या मालकीची आहे? त्याच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स, बॅज आणि आवश्यक परवाने होते का? तो अधिकृत रिक्षा स्टँडवर प्रवासी कसा घेत होता? याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे.

DN SPORTS

kamlakar


शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. दररोज हजारो भाविक शहरात येतात. अशा ठिकाणी जर कोणालाही कोणतीही पडताळणी न करता रिक्षा चालविण्याची संधी मिळत असेल, तर ही केवळ एका गुन्हेगाराची चूक नसून व्यवस्थेतील त्रुटी असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘साखळी’वर कारवाई झाली तरच गुन्हे थांबतील
गुन्हा घडल्यानंतर आरोपींना अटक करणे ही पोलिसांची जबाबदारी आहेच; मात्र जर कोणत्याही वाहनमालकाने किंवा संबंधितांनी नियमांकडे दुर्लक्ष करून अपात्र व्यक्तीला वाहन चालवू दिले असेल, तर अशा व्यक्तींची भूमिकाही तपासली जावी. तपासात दोष आढळल्यास त्यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


भाविकांचा प्रश्न — सुरक्षित शिर्डीची जबाबदारी कोणाची?
साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकालाच रिक्षामध्ये मारहाण करून लुटले जात असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा घटनांमुळे शिर्डीच्या प्रतिमेलाही धक्का बसू शकतो. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ प्रत्यक्ष आरोपींपर्यंत मर्यादित न ठेवता, रिक्षा व्यवस्था, परवाना प्रणाली, वाहनमालकांची जबाबदारी आणि संबंधित यंत्रणांची भूमिका यांचीही सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.


संपादकीय चौकट : अनुत्तरित प्रश्न
आरोपींकडे रिक्षा कशी आली?
रिक्षा कोणाच्या मालकीची आहे?
चालकाकडे वैध परवाना, बॅज आणि आवश्यक कागदपत्रे होती का?
अधिकृत रिक्षा स्टँडवर तो प्रवासी कसा घेत होता?
नियमांचे उल्लंघन झाले असेल, तर संबंधित जबाबदारांवरही कारवाई होणार का?
शिर्डीसारख्या जागतिक तीर्थक्षेत्रात भाविकांच्या सुरक्षेवर कोणतीही तडजोड होऊ नये. या प्रकरणात तपास निष्पक्ष, सर्वसमावेशक आणि पुराव्यावर आधारित होऊन, दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button