Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

शिर्डी शहराला हादरवून सोडणाऱ्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य संशयित भोंदू अशोक खरात याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राहाता न्यायालयाने शनिवारी खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत थेट नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“तपासात सहकार्य नाही”; पोलिसांचा कोर्टात गंभीर दावा ⚠️
तपास अधिकारी निवांत जाधव यांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणातील अन्य संशयित कल्पना खरात हिचा शोध अद्याप सुरू असून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी बाकी आहे. तसेच अशोक खरात तपासात अपेक्षित सहकार्य करत नसल्याचा गंभीर दावा सरकारी पक्षाने केला. त्यामुळे पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला.


“काही तक्रार आहे का?” न्यायालयाच्या प्रश्नावर खरातचे मौन 👀
सुनावणीदरम्यान न्यायालयाने अशोक खरातला “काही तक्रार आहे का?” असा थेट प्रश्न विचारला. त्यावर खरातने “नाही” असे उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयीन आदेश मिळताच शिर्डी पोलिसांनी त्याची पुन्हा नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. त्यामुळे पुढील किमान दोन आठवडे तरी खरातचा मुक्काम जेलमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिक एसआयटी पुन्हा ताबा घेणार? शिर्डीत चर्चांना उधाण 🔥
दरम्यान, अशोक खरात सध्या न्यायालयीन कोठडीत असला तरी नाशिक एसआयटी दुसऱ्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी त्याचा पुन्हा ताबा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बहुचर्चित जमीन गैरव्यवहार प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून शिर्डीतील राजकीय वर्तुळातही प्रचंड खळबळ उडाली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button