Letest News
शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई!
Blog

शांत, सुस्वभावी ज्येष्ठ पत्रकार किशोर पाटणी यांचेवर वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातून होत आहे शुभेच्छांचा वर्षाव!

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी येथील ज्येष्ठ पत्रकार किशोर पाटणी यांचा आज बुधवार 13 डिसेंबर 2023 रोजी वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ज्येष्ठ पत्रकार किशोर पाटणी हे अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय व प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे त्यांचा राहता शिर्डी कोपरगाव व संपूर्ण नगर जिल्ह्यात पत्रकारांबरोबरच इतर क्षेत्रातील मान्यवर मध्ये मोठा जनसंपर्क असून त्यांचा शांत स्वुभावी व सर्वांशी हसून खेळून राहणारा स्वभाव यामुळे ते सर्व पत्रकारांमध्ये एक लोकप्रिय पत्रकार म्हणून गणले जातात. कोणत्याही सर्वसामान्य व गोरगरीब, व्यावसायिक किंवा कोणत्याही साईभक्त यांचे प्रश्न समस्या असली तर त्याचा आपल्या लेखणीतून सातत्याने पाठपुरावा करून त्या सोडवण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. त्यांनी दैनिक सार्वमत, दैनिक देशदूत, दैनिक जनप्रवास, अशा अनेक मोठ्या वृत्तपत्रात काम केले आहे. सध्या ते दैनिक पुण्यनगरी चे काम करत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


पत्रकारिता करीत असताना आपल्या सहकारी, पत्रकार, मित्र, व्यवसायिक , व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याशी त्यांचा सातत्याने विचार विनिमय होत असतो. पत्रकारीता करतानाच आपले घर संसार तसेच मुले त्यांनी सुसंस्कृत केली आहेत. कोणाशीही भांडण तंटा नाही, वादविवाद नाही. आपल्या कामाशी काम करणे व आपल्याला जेवढी मदत आपल्या परीने करता येईल तेवढी करणे असे त्यांचे कार्य सर्वत्र परिचित आहे. शिर्डी पत्रकार संघाचे ते अध्यक्ष आहेत. त्यामुळे शिर्डीतील ग्रामीण भागातील व शहरातील छोट्या मोठ्या पत्रकारांना आपल्या बरोबर घेऊन अडचणीला धावून जाणे. वेळप्रसंगी योग्य ते मार्गदर्शन करणे. एकमेकांना सहकार्य मदत करणे. असे त्यांचे कार्य आज नाहीतर अनेक वर्षापासून दिसून येते. म्हणूनच त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळेच त्यांना वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सर्वसामान्यांकडून त्यांचा सन्मान सत्कार होत आहे. सोशल मीडियावर अभिनंदन करण्यात येत आहे‌. दैनिक साईदर्शन परिवारातर्फे ही ज्येष्ठ पत्रकार किशोर पाटणी यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button