Letest News
लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल...
क्राईमशिर्डी

जितेश लोकचंदानी यांनी भूपेंद्र पाटील, सचिन बडे व निलेश वाकचौरे यांच्यासह ज्यांनी ज्यांनी फोन करून  धमकी दिली त्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केली फिर्याद!

शिर्डी (प्रतिनिधी)

sai nirman
जाहिरात

शिर्डी येथील  भूपेंद्र पाटील यांच्या विरोधात बातमी का टाकली, असे म्हणत मोबाईल वरून प्रथम सचिन बडे व नंतर निलेश वाकचौरे यांनी दमबाजी करीत अरेरावीची भाषा वापरली असून भविष्यात त्यांच्यापासून जीवितीला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशा अशायाची फिर्याद पत्रकार  जितेश लोकचंदानी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली आहे. 

या संदर्भात अधिक माहिती अशी की, शिर्डी येथील पत्रकार जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,मी शिर्डी येथील पत्रकार असुन मी दैनिक साईदर्शन हे वृत्तपत्र व युट्युब वृत्तवाहिनी चालवित असतो,दि.01/04/2025 रोजी सायंकाळी 06/00 वा. मी माझे राहते घरी कालिकानगर शिर्डी येथे दैनिक साईदर्शन वृत्तपत्र व ऑनलाईन चॅनल चालवित असतांना मी एक बातमी प्रसारित केली की, शिर्डी मध्ये 500 कोटी रूपये शेअर मार्केट मध्ये गुंतवून व जास्त पैशाचे आमिष दाखवुन शिर्डी येथील भुपेद्र पाटील याने फसवणुक केली आहे. त्यानंतर 06/15 वा. चे सुमारास माझे मोबाईल मोनं. 8329480310. यावर 9923153414 या नंबर वरून फोन आला असता मी त्यास विचारले की, तुमचे काय काम आहे, तुम्ही कोण बोलता, त्यावेळी त्याने सांगितले की, मी सचिन बड़े (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) बोलतो असे सांगुन, तुम्ही टाकलेली बातमी का प्रसारित केली. मी तुमच्याकडे बघुन घेईल. असे म्हणुन त्याने फोन ठेवला, त्यानंतर पुन्हा माझ्या मोबाईल वर नमूद मोबाईल नंबरवर 9766731001 या क्रमांकावरून मला 3 वेळा फोन आला असता मी फोन उचलला नाही. त्यांनतर त्याच मो.नं, 9766731001 वरून माझे व्हाटसप वर मेसेज आला की, मला कॉल कर, सदर मेसेज वाचून मी त्यास कॉल केला असता तिकडुन एका इसमाने फोन उचलला व मला म्हणाला की, मी निलेश वाकचौरे पाटील रा. पिंपळवाडी, हॉटेल केबीएस ग्रँडचा मालक बोलतो, तुम्ही भुपेद्र पाटील संदर्भात बातमी का प्रसारित केली,? असे बोलुन मला दमबाजी करीत आरेतुरेची भाषा वापरली. त्यानंतर मी तो फोन कट केला. व त्यांनतर मला माझ्या मोबाईलवर वेगवेगळ्या नंबरवरून 100 ते 150 लोकांचे फोन येत होते. परंतु मी ते रिसिव्ह नाही केलें. तरी मी भूपेंद्र पाटील यांचे संदर्भात प्रसारित केलेल्या बातमीच्या अनुषंगाने मला मो. क्रं. 9923153414 सचिन बडे (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) व मो. क्रं. 9766731001 निलेश वाकचौरे पाटील रा. पिंपळवाडी, हॉटेल केबीएस ग्रँड  या दोघांनी माझ्या मो. क्रं. 8329480310. यावर दमबाजी करून आरेतुरेची भाषा वापरली आहे. तरी भविष्यात त्यांचेपासुन माझ्या जिवीतास धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून माझी त्यांचेविरुध्द फिर्याद आहे. अशा आशयाची शिर्डी पोलीस ठाण्यात  जितेश लोकचंदानी फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पो.स्टे.ला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 267/ 2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 351 (4 )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास शिर्डीचे पोलीस करत आहेत.

DN SPORTS

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button