Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
अ.नगरक्राईम

पुतण्याचा चुलत्यावर कोयत्याने हल्ला | Crime News

अहमदनगर | पुतण्याने चुलत्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. 2) सकाळी 11 वाजेच्या सुमारास नालेगाव भागातील शिव पवन मंगल कार्यालयाच्यापाठीमागे घडली. हरिष भीमराव वाघचौरे (वय 47 रा. शिव पवन मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, नालेगाव) असे जखमी चुलत्याचे नाव आहे.

sai nirman
जाहिरात

त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पुतण्या सिध्दांत चंद्रकांत वाघचौरे (रा. शिव पवन मंगल कार्यालयाचे पाठीमागे, नालेगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता फिर्यादी त्यांच्या घराच्या भिंतीला पाईपलाईनचे काम करत असताना पुतण्या सिध्दांत त्याच्या पत्नीला मारहाण करून घराच्या बाहेर आला.

त्याने फिर्यादीची आई साखराबाई भीमराव वाघचौरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या हातात कोयता होता. कोयत्याने फिर्यादीवर हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमी फिर्यादी यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button