Letest News
गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या... "गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" शिर्डीतून नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभग... अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त 
अ.नगरशिर्डी

साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेमार्फत “वृक्ष प्रसाद योजना” औपचारिकपणे सुरु

शिर्डी – निसर्ग संवर्धन आणि भक्ती यांचे सुंदर समन्वय साधत शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेमार्फत “वृक्ष प्रसाद योजना” दि. १० जुलै २०२५ पासून औपचारिकपणे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत इच्छुक साईभक्तांना प्रसादस्वरूप निंबवृक्षाची रोपे वितरित केली जात आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सह्याद्री देवराईचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते श्री सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाचे स्वागत महाराष्ट्रातील विविध प्रमुख मंदिरे करत असून, श्री साईबाबा संस्थान शिर्डीनेही यामध्ये पुढाकार घेतला आहे.

साई सत्चरित्रात उल्लेख केल्यानुसार श्री साईबाबांनी निंबवृक्षाला अत्यंत पवित्र स्थान मानले असून, “या निंबवृक्षाखाली माझ्या गुरूंचे स्थान आहे,” असे त्यांनी सांगितले होते. त्याच भक्तिपूर्ण संदर्भातून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ श्रीमती मंगला वराडे, मुख्य लेखाधिकारी, श्रीमती प्रज्ञा महांडुळे, प्रशासकीय अधिकारी आणि श्री अनिल भणगे, कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

वृक्ष म्हणजेच जीवनदायी ऑक्सिजनचा स्रोत, अन्नाचा आधार आणि पर्यावरणाचा रक्षक. त्यामुळे या “वृक्ष प्रसाद योजना”च्या माध्यमातून भक्तांनी निसर्गसेवेतही सहभाग घ्यावा, असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button