Letest News
गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या... "गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" शिर्डीतून नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभग... अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त 
अ.नगरशिर्डी

गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी साईभक्ताने संस्थानला अर्पण केला सोन्याचा मुकुट व चांदीचा हार

गुरुपौर्णिमा म्हणजेच श्रद्धा आणि भक्तीचा सर्वोच्च दिवस — जो आपल्या आध्यात्मिक गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनुपम योग आहे. या पवित्र दिवशी श्री साईबाबा समाधी मंदिरात भाविकांच्या ओघात श्रद्धेचा अजून एक प्रेरणादायी क्षण आज अनुभवायला मिळाला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


आज गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी, एका अज्ञात साईभक्ताने सुमारे २ किलो वजनाचा चांदीचा आकर्षक हार आणि सुमारे ५९ लाख रूपये किंमतीचा ५६६ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करत, संस्थानकडे देणगी स्वरूपात अर्पण केला सदर साईभक्ताच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.


या दानामध्ये निस्वार्थी भक्ती, भावनांची श्रीमंती आणि गुरूप्रतीची नितांत श्रद्धा दडलेली आहे. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सदर साईभक्ताचे सन्मान करण्यात आला.

गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मशुद्धी, विनम्रता व गुरूंच्या कृपाशीर्वादाचा अनुभव घेण्याचा प्रसंग असतो. अशा पावन दिवशी साईबाबांच्या चरणी अर्पण केलेले हे देणे, प्रत्येक भाविकासाठी श्रद्धेचे प्रतीक ठरेल.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button