Letest News
राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!
अ.नगरशिर्डी

शिर्डीत गर्दीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर फिरून प्रबोधन करणाऱ्या वरिष्ठ तथा दबंग अधिकारी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार!

शिर्डी (प्रतिनिधी) सरत्या वर्षाला निरोपण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर
शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार साहेब यांनी रविवारी मंदिर परिसरात तसेच शिर्डीच्या मुख्य बाजारपेठेत आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन भाविकांच्या सुरक्षेच्या संदर्भात फेरी मारली.दुकानदार,रिक्षावाले एजंट यांना साईभक्तांच्या सुरक्षेबाबत सूचना केल्या तसेच गर्दीचा फायदा घेऊन जर भाविकांची लूट केल्यास जबर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. रिक्षावाल्यांनी साई भक्तांकडून जास्त भाडेआकरू नये .रिक्षात मौल्यवान वस्तू राहिल्या तर त्या पोलीस स्टेशनला किंवा संस्थान सुरक्षा विभागात जमा कराव्यात. असे ते सांगत होते.
प्रथमच शिर्डीतील एक अधिकारी अश्या प्रकारे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरून प्रबोधन करत असेल तर आपण देखील अश्या अधिकाऱ्याच्या मागे उभे राहणे गरजेचं आहे..याच कारणास्तव पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार साहेबांचा सन्मान शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने निलेश कोते,सचिन कोते,संजय कोतकर.आदींनी शाल पुष्पगुच्छ देऊन केला. या सन्मानामुळे त्यांना आणखी एक प्रकारची ऊर्जा मिळेल व शिर्डीतही चांगले वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button