Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरशिर्डी

सलमान खानच्या यश आणि दीर्घायुष्यासाठी सलमानच्या आईचे शिर्डीत साईबाबांना साकडे!

शिर्डी (प्रतिनिधी) साईबाबांवर श्रद्धा ठेवली तर सर्व काही सुखरूप होते. याचा प्रत्यय आम्हाला आला आहे अशी भावना सलमान खानची आई सलमा खान यांनी, साईं दर्शनानंतर व्यक्त केली. सलमान खानचा नुकताच 27 डिसेंबर रोजी गुजरात राज्यातील जामनगर येथे 59वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सलमानच्या वाढदिवसाला संपूर्ण कुटुंबियांनासह अनेक नामांकित व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. ‘भाईजान’चा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याची आई सलमा खान आणि बहीण अलवीरा अग्निहोत्री यांच्या कुटुंबीयांनी आज सलमानच्या यश आणि दीर्घायुष्यासाठी शिर्डीत येऊन साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं. सलमा खान या साईभक्त असून नेहमी त्या दर्शनासाठी शिर्डीला येत असतात.

मात्र मध्यंतरी कोरोना महामारीच्या काळात त्यांना साईबाबांच्या दर्शनासाठी येता आलं नाही. आज खुप वर्षांनी साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानं त्यावेळी त्या भावुक झाल्याचा दिसल्या. दर्शनाच्या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. साईबाबांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या कुटुंबियांनावर राहिला आहे,

साईबाबांचा आशीर्वाद असाच कायम राहो अशी प्रार्थना सलमा यांनी साई चरणी केली.साईबाबांच्या दर्शनानंतर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सलमा खान यांच्यासह संपूर्ण कुटूंबियांचा शॉल, साई मूर्ती देवून सत्कार केला.

यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, प्रशांत सूर्यवंशी, मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी, आदी उपस्थिती होते. सलमा खान यांना आज साईबाबांची माध्यान्ह आरती करण्याची इच्छा होती. मात्र त्यांना येण्यास उशीर झाल्यानं साईंचे दर्शनावर समाधान मानावं लागलं. त्याची हूरहूरही त्यांनी बोलून दाखवली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button