Letest News
शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली!
राजकीय

जोपर्यंत जेष्ठ पत्रकारांचे न्याय व हक्क त्यांना मिळत नाही तोपर्यंत पत्रकार संरक्षण समिती आपल्या मागण्यासाठी ठाम राहील विनोद पत्रे

जेष्ठ पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी पत्रकार संरक्षण समिती ने क्रांतिदिनी ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे सह पाच पदाधिकारी यांनी दिला होता .
यवतमाळ पोलीस निरीक्षक अंतर्गत dsb चे काही पोलीस पत्रे यांच्या घरी त्यांना अटक करण्यासाठी रवाना झाली होती.
परंतु घराला लॉक असल्यामुळे गेल्या पावली पोलिसांना परत फिरावे लागते.त्यामुळे मंत्रालयातील माहिती प्रसारण खाते खडबडून जागे झाले. वरिष्ठांचे फोन खणखनू लागले.
त्यांना अटक व कारवाई करण्यासाठी काही वेळ पोलिसांची तारांबळ उडाली.अखेर, फोन नंबर करून विनोद पत्रे ह्यांना बोलावून सामूहिक आत्मदहन दिलेला इशारा मागे घेण्या संदर्भात लेखी लिहून देण्याबाबत पोस्टेला लेखी लिहून देण्यात यावे,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. परंतु जोपर्यंत जेष्ठ पत्रकारांचे न्याय व हक्क त्यांना मिळत नाही तोपर्यंत पत्रकार संरक्षण समिती आपल्या मागण्यासाठी ठाम राहील, असे महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष मा. विनोद पत्रे ह्यांनी ह्यावेळी सांगितले.
‘ ना जाती साठी, ना माती साठी
लढाई फक्त पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी ‘ ही बिरुदावली ऐटीत मिरवणाऱ्या पत्रकार संरक्षण समितीने राज्य भर खळबळ उडवून दिली आहे.
सद्या पत्रे हे पोलीस निगराणी मध्ये असून DG पोलीस ऑफिस मधून त्यांना वारंवार विचारणा केली जात आहे.
विशेष असे की, सहा जणांनी दिलेल्या सामूहिक आत्मदहन करणाऱ्या पत्रकारापैकी तीन पत्रकारांचा शोध लागला नसल्यामुळे पोलीस प्रशासनाची झोप उडाली असल्याचे दिसून येत आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button