Letest News
जालिंदर बोरुडेला ५ दिवसांची पोलीस कोठडी तपासाला वेग "साईभक्तांच्या सुरक्षिततेसाठी झटणारे सुरक्षा अधिकारी माळी सेवाभावातून जिंकली भाविकांची मने" मतदार यादी पुनर्विलोकन मोहिमेत शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा : अविनाश सनस कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संयम संपत चालला-न्यायासाठी संघर्ष तीव्र करण्याचे संकेत अहिल्यानगर-कोपरगाव-राहता येथे अतिक्रमणांवर कारवाई-मग शिर्डीत वेगळा न्याय का? लिंगनिदान रॅकेटचा आणखी एक सूत्रधार जेरबंद-५ सोनोग्राफी मशीन-१९ आरोपी आणि ६ डॉक्टर गजाआड समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुवि... लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री दीड लाखांचे दागिने सापडूनही मोह टाळला-स्वच्छता कर्मचाऱ्याने जपला साईसेवेचा मान दारूबंदी विभाग सुस्त-नगर परिषद मस्त-पोलिसांची सुरू आहे गस्त! शिर्डीत दारू धंदे सुरू आहे बिनधास्त
राजकीयशिर्डी

मातृछत्र हरपले… शिर्डीतील सौ. कमल शांताराम मिराणे यांचे दुःखद निधन

शिर्डी :
शिर्डी येथील सौ. कमल शांताराम मिराणे यांचे आज (दि. ८ मार्च २०२६) दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मिराणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शिर्डी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


कमल मिराणे या अत्यंत प्रेमळ, संयमी आणि कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. त्यांनी आयुष्यभर कुटुंबाची जपणूक करत आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले. त्याग, प्रेम आणि कष्ट यांच्या बळावर त्यांनी आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवत मुलांना प्रामाणिकपणा, समाजाभिमुखता आणि कर्तव्यनिष्ठेचे धडे दिले. त्यामुळे आज मिराणे कुटुंब सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करू शकले आहे, असे अनेक जण सांगत आहेत.


त्यांचे पती शांताराम मिराणे हे शिर्डी येथील नाट्य रसिक संचचे संस्थापक असून सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. तसेच ते श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त म्हणूनही कार्यरत होते. त्यांचे चिरंजीव नितीन मिराणे हे आजतक pti वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
कमल मिराणे यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रेमाने जपले. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातही आदराचे स्थान मिळवून होत्या. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक प्रेमळ आई, आजी आणि आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज (दि. ८ मार्च २०२६) रोजी रात्री ९.३० वाजता त्यांच्या राहत्या घरातून “काशीराम”, ५२ बंगले, शिर्डी येथून निघून शिर्डी येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


शोकाकुल :
शांताराम मिराणे,
नितीन मिराणे, तन्मय मिराणे, सुकृत मिराणे व मिराणे परिवार.
🙏 “आई हे घराचे हृदय असते… आज तेच हृदय शांत झाले.”
कैलासवासी कमल मिराणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button