Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
अ.नगरक्राईम

३ गावठी पिस्टल १० जिवंत काडतुसे ६ मॅगझीन व एक इर्टिगा कार सह दोन आरोपी ताब्यात

श्रीरामपूर प्रतिनिधी/ श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे बबलु ऊर्फ इम्तीयाज शहा रा.वार्ड नं.२ श्रीरामपुर. हा इटींगा गाडी क्र. एम.एच.१२ एस.डी. ७३३८ यामध्ये अवैधरीत्या अग्नीशस्त्र विक्रीसाठी घेवुन येत आहे संजय नगर रोड, मिल्लत नगर येथे पाटाचे कडेला सापळा लावुन सदरची इटींगा गाडी पकडण्यात आली गाडीमध्ये दोन इसम मिळून आले त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांचे नावे १) बबलु ऊर्फ इम्तीयाज आजिज शहा, वय ३५ वर्ष, वार्ड नं. २, श्रीरामपुर

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

२) नदिमखान शाबीर खान वय ३० वर्ष रा.नागद रोड, चाळीसगांव असे सांगितले. वाहानाची झडती घेता वाहनाचे डॅशबोर्ड व मागील शिटचे पॉकेटमध्ये एकुण तीन अवैध अग्नीशस्त्र (गावठी पिस्टल), ६ मॅगझीन, व १० जिवंत काडतुसे, २ मोबाईल फोन व इटींगा गाडी असा एकुण ७,३०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.वरील आरोपी विरुध्द श्रीरामपुर शहर पो.स्टे. गु.र.नं. ८७७/२०२५ आर्म अॅक्ट ३,५,७,२५ वगैरे प्रमाणे पो.कॉ. १७४६ सतिष पठारे श्रीरामपुर यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, नितीन देशमुख याच्या मार्गदर्शनाखालीपोलीस उपनिरीक्षक, रोशन निकम हे करत आहेत.गुन्ह्याच्या आतापर्यंतच्या तपासात आरोपीविरुध्द यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.

आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यांचेकडे सविस्तर विचारपुस सुरु आहे. आरोपींनी अग्नीशस्त्र का आणले? कोणासाठी आणले? यापुर्वी अशा प्रकारे अग्नीशस्व आणले होती काय? कोणाकडून आणले या सर्व बाबींचा बारकाईने तपास सुरु असुन त्या अनुषंगाने काही संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई ही मा.श्री.सोमनाथ घार्गे सारे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, तसेच श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर वांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. रविंद्र चव्हाण, पो.हे.कॉ. सचिन धनाड, पो.हे.कॉ. संतोष दरेकर, पो.ना. काका मोरे, पो.ना. अनिल शेंगाळे, पो.ना. रामेश्वर वेताळ, पो.कॉ. सतिष पठारे, पो.कॉ. नितीन शेलार (पो. मुख्या.),

पो.कॉ. अजय अंधारे (पो.मुख्या.), आर.सी.पी. पथकातील पो.कॉ. सचिन शेळके, पो.कॉ. गायके, पो.कॉ. भोई, पो.कॉ. आहिरे व श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. गणेश जाधव, पो.स.ई. दादाभाई मगरे, पो.स.ई. रोशन निकम, पो. कॉ. संपत बड़े असे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button