Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
Blog

आळंदीला जाणाऱ्या दिंडीत मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांनासाईसंस्थानने मदतीचा हात द्यावा-भारतीय लहुजी सेना

(प्रतिनिधी)- शिर्डी ते आळंदी दिंडी सोहळ्यातील
वारकरी भक्तिमय वातावरणात प्रवास करत असताना रविवारी
या पालखीला संगमनेर तालुक्यातील माऊली घाटाजवळ
अपघात झाला. या अपघातात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला
तर काही वारकरी जखमी झाले. या मयत झालेल्या वारकऱ्यांना
साईबाबा संस्थानने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भारतीय
लहुजी सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

महंत काशिकानंद
महाराज, शिर्डी ग्रामस्थ व साईबाबा संस्थानने या पालखीचा
साई पालखी सोहळा असे नामकरण केलेले आहे. महंत
काशिकानंद महाराज यांच्या प्रेरणेतून अनेक वर्षांपासून धार्मिक
ठिकाणी हजारो वारकऱ्यांना बरोबर घेऊन या पालखीतील
वारकरी भाविक धार्मिक दर्शनाचा लाभ घेतात. मात्र अचानक
या पालखीचा अपघात होऊन चार वारकऱ्यांना आपला जीव
गमवावा लागला. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून
त्या कुटुंबाला शासकीय मदत मिळेलच यात काही शंका नाही
मात्र सदर कुटुंबाला व जखमी झालेल्या कुटुंबातील वारकऱ्यांना
साईबाबा संस्थान त्रिसदस्यीय समितीने मदतीचा हात पुढे
करावा, अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष
मंजाबापू साळवे यांनी साईबाबा संस्थानकडे केली आहे. या
निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव
हनिफ पठाण, राज्य कार्याध्यक्ष समीर वीर, सुरेश अडागळे,
दगडू साळवे, संतोष भडकवाड, नंदू आरणे, सोपानराव पगारे,
भाऊसाहेब आव्हाड, राष्ट्रीय सरचिटणीस रामभाऊ पिंगळे आदी
पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button