Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
अ.नगरक्राईम

महिलेसह तिघांना मारहाण,चौघांवर गुन्हा दाखल

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या महिलेला त्यांच्या हद्दीत फलक (बोर्ड) लावण्याच्या कारणावरुन आरोपी आकाश प्रकाश सोनार व अक्षय प्रकाश सोनार व त्यांचे हॉटेल वरील दोन अज्ञात कामगार या चौघांनी फिर्यादी महिला संगीता निवृत्ती देवकर (वय-४५)तिचा दिर ज्ञानेश्वर देवकर,तिची जाव वैशाली देवकर आदींना शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याने त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोकमठाण आणि शिवारात खळबळ उडाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

कोपरगाव परिसरात किरकोळ कारणावरुन मारहाण करण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.अशीच घटना नुकतीच कोकमठाण शिवारात उघड झाली आहे.त्यातील फिर्यादी महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण आणि आपले पती,दिर जाव आणि मुले आदी परिवार कोकमठाण शिवारात रहिवासी असून दि.१२ मे रोजी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास कोकमठाण हद्दीत रहिवासी असलेले आरोपी हॉटेल चालक आकाश प्रकाश सोनार व अक्षय प्रकाश सोनार व त्यांचे हॉटेल वरील दोन अज्ञात कामगार या चौघांनी त्यास हरकत घेतली होती.

kamlakar

त्यावेळीआपण सदर फलक हा आपल्या जागेत लावत असल्याचे सांगितले होते.मात्र त्यांनी त्याचा कोणताही मुलाहिजा न बाळगता आपल्याला व आपला दिर ज्ञानेश्वर देवकर,आपली जाव वैशाली देवकर आदींना शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण केली आहे व आपल्याला गंभीर दुखापत केली आहे.

परिणामी आपली मोडतोड झाल्याने आपण उपचारार्थ खाजगी दवाखान्यात भरती झालो होतो.दरम्यान उपचार केल्यानंतर आपण कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आज दुपारी ०२ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२५३/२०२४ भा.द.वि.कलम ३२६,३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी,सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा,पो.हे.कॉ.तमनर आदींनी भेट दिली आहे.दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.तमनर हे करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button