Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
राजकीय

“यंदा शिर्डीचा खासदार राजकीय नेत्यांच्या तालावर ठेका धरणारा बाहुला नको”

"यंदा शिर्डीचा खासदार राजकीय नेत्यांच्या तालावर ठेका धरणारा बाहुला नको"

कोपरगाव:-डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक हक्का मुळे शिर्डी लोकसभा मतदार संघ पुनर्रचनेत अनुसूचीत जाती साठी राखीव झाला मात्र मागील तिन्ही निवडणुकीतील उमेदवार हे राजकीय नेत्यांच्या तालावर ठेका धरणारे होते मात्र यंदाच्या निवडणुकीत तरी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्काची जाणीव असणारा लोक प्रतिनिधि निवडून द्यावा असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ॲड नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचीत जातीचे प्रतिनिधि निवडून जावे म्हणून आग्रह धरला होता महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान पुणे येथे ऐतिहासिक पुणे करार करण्यात आला आणि तेंव्हा पासुन विविध जातींना आरक्षण देण्यात आले त्या मुळे आरक्षित मतदारसंघ राखीव ठेवून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली
सण २००९ साली पुनर्रचनेत शिर्डी लोकसभा मतदार संघ अनुसूचीत जाती साठी राखीव झाला.राजकीय दृष्ट्या सक्षम नेतृत्व असलेल्या या मतदार संघातून त्या पूर्वी स्व बाळासाहेब विखे,स्व शंकररावजी काळे, प्रसाद तनपुरे, या साखर सम्राट नेत्याना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्याच बरोबर कोणत्याही प्रकारे आर्थिक पाठबळ नसताना स्व भिमराव बडदे यांना देखिल प्रस्थापितांना नाकारून जनतेने प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली
२००९ साली पुनर्रचनेत शिर्डी लोकसभा मतदार संघ अनुसूचीत जाती साठी राखीव झाला त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी उमेदवारी केली मात्र दगडा पेक्षा विट बरी असा विचार करून प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राजकारणात नवख्या असलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडून दिले त्या नंतर पुढच्या निवडणूकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेने ला सोडचिठ्ठी दिल्याने अवघ्या १७ दिवसात मोदी लाटेवर स्वार झालेल्या सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडून दिले पुढे २०१४ मध्ये देखील सदाशिव लोखंडे यांना निवडून दिले मात्र वाकचौरे यांनी पाच व लोखंडे यांनी दहा वर्षे अनुसूचीत जातीचे प्रतिनिधित्व करण्या ऐवजी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या तालावर ठेका धरण्यात धन्यता मानली पंधरा वर्षे अनुसूचीत जातीचे प्रतिनिधित्व करत असताना या उमेदवारांना आपण अनुसूचीत जातीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडून गेलो याचा विसर पडला
एकाने पक्षाशी गद्दार होऊन सत्ते साठी पक्ष सोडला तर दुसऱ्याने नेत्याशी व जनतेशी बेईमान होऊन पक्ष सोडला अशा त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याच्या भावना आहेत. मात्र त्याही पेक्षा ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढ्याने अनुसूचीत जातीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. व शोषित वंचित यांचे प्रश्न उपस्थित केले नाही ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी मोठी बेइमानी आहे.आगामी काळात होणाऱ्या लोक सभा निवडणुकीत पुन्हा एकदा ह्या उमेदवारांच्या नावाची चर्चा होत असली तरी यंदाच्या निवडणूकीत राजकीय नेत्यांच्या तालावर ठेका धरणारा नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या व राज्य घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर परखड विचार करणारा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button