Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
राजकीयशिर्डी

राहात्याचा पांडुरंग प्रेमळ हातांना मुकला; शशिकला आज्जींच्या रूपाने भक्तीचा मणी निखळला३५ वर्षांची अखंड सेवा थांबली

राहात्याचा पांडुरंग प्रेमळ हातांना मुकला…
३५ वर्षांच्या अखंड सेवेनंतर शशिकला आज्जींच्या रूपाने भक्तीचा एक मणी निखळला
गेली तब्बल ३५ वर्षे राहाता येथील पांडुरंग मंदिराची स्वच्छता, नित्यसेवा, प्रेमळ मनाने केली जाणारी पूजा-आरती आणि निस्सीम भक्तीची परंपरा वाघमारे कुटुंबातील कर्त्या शशिकला आज्जी व सुशीलाताई बावळे यांनी अखंडपणे जपली.
आज मात्र त्या माळेतील एक अमूल्य मणी निखळला… आणि जणू “राहात्याचा पांडुरंग प्रेमळ मनाच्या आंघोळीला मुकला” अशी भावना संपूर्ण परिसरात दाटून राहिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मला तर क्षणभर असेच वाटले —
या निस्सीम भक्ताच्या जाण्याने पांडुरंगही सद्गदित झाला असावा…
भक्तीचे संस्कार पाळण्यातच रुजले
शशिकला आज्जींचा जन्म जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील नालेवाडी येथे आई वत्सलाबाई व वडील बाबुराव जाधव यांच्या पोटी झाला. घरातच भक्तीमार्गाची परंपरा असल्याने लहानपणापासूनच त्यांचे मन संस्कारांनी घडत गेले.
पुढे पाथर्डी येथील पोपटराव नाना वाघमारे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सुमारे दहा वर्षे पाथर्डीत संसार सांभाळल्यानंतर, पोपटराव बाबांच्या बहीण गोधाबाई आभाडे यांच्या आग्रहाने त्या राहाता येथे आल्या.


पहाटे उघडणारे राहात्याचे पहिले इस्त्री दुकान
राबिया नगरच्या कोपऱ्यावर मासमअली सय्यद (बाबा खाटीक) यांनी दिलेल्या जागेवर त्यांनी इस्त्रीचे छोटेसे दुकान थाटले.
पहाटे चार वाजता उठून सडा-समार्जन करून उघडणारे हे राहाता येथील पहिले दुकान ठरले.
दुकानासमोर मोकळी जागा असल्याने परिसरातील चार-पाच गावांतील गावपुढारी, ज्येष्ठ मंडळी येथे बसून पेपर वाचत, चर्चा करत.
ही जागा केवळ दुकान नव्हे, तर सामाजिक सलोख्याचे केंद्र बनली होती.
कडक आवाज, पण मन अपार प्रेमळ
शशिकला आज्जींचा आवाज कडक —
पहिल्यांदा ऐकणाऱ्याची क्षणभर धारण बसेल असा!
मात्र त्या शिस्तप्रिय असल्या तरी मनाने अत्यंत प्रेमळ होत्या.


एक मात्र निर्विवाद सत्य —
ज्याच्या आयुष्यात त्यांच्या शिस्तीचे संस्कार पडले, त्याचे जीवन निश्चितच घडले.
पतीच्या निधनानंतरही न डगमगलेली कणखर आई
साधारण १९९५ साली श्री. पोपटराव बाबा यांचे निधन झाले.
अचानक संसाराचा संपूर्ण भार शशिकला आज्जींच्या खांद्यावर आला.
त्या वेळी त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना दिलेला शब्द आजही कानात घुमतो —
“मी आहे तुमच्या पाठीशी… तुम्हाला काही कमी पडू देणार नाही.”


या शब्दांनी दोघांच्या अंगात जणू हत्तीचे बळ संचारले.
थोरला मुलगा राजू याच्यासोबत दुकानाचा गाडा पुन्हा सुरू केला, तर धाकटा मुलगा संजय याला कॉलेज व डी.एड. शिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे केले.
संजयनेही शिक्षणासोबत दुकानात उभे राहून भावाला साथ दिली.
सेवा, कष्ट आणि शिस्तीचा अखंड दिनक्रम
पहाटे एकट्याच मोठ्या प्रमाणावर इस्त्रीचे काम,
सकाळी राजूकडे दुकान सोपवून घरकाम व पांडुरंगाची पूजा,
पुन्हा दुकानात परत हजर —
हा दिनक्रम त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत बदलला नाही.


त्यांच्या कडक शिस्तीतच नातवंडे घडली.
संस्कारांची फळे आज देशपातळीवर
त्यांचे संस्कार आज पुढील पिढीत तेजाने फुलताना दिसतात —
नात आदिती (१९ वर्षे) — महाराष्ट्र क्रिकेट संघात उत्कृष्ट कामगिरी
नात श्रीतेज — क्रिकेटमध्ये झपाट्याने प्रगती
नात प्रियंका व नातू प्रणव — इंजिनिअरिंग शिक्षण घेऊन चांगल्या पदावर कार्यरत
हे सारे शशिकला आज्जींच्या कष्टांचे व संस्कारांचे फळ आहे.


धर्मापलीकडचे नाते, माणुसकीचा आदर्श
राबिया नगरमधील मुस्लीम समाजाला शशिकला आज्जी म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते.
कधीच हिंदू-मुस्लीम असा भेद जाणवू दिला नाही.
सणवारांचे जेवण एकमेकांकडे होत असे,
जाता-येता हसतमुखाने बोलल्याशिवाय कोणी पुढे जात नसे.
शेवटच्या आजारपणात, सून संगीता यांच्या ऑपरेशनमुळे
रुकसाना व सुजाता यांनी स्वतःच्या आईप्रमाणे त्यांची सेवा केली.
सून संगीता व सोनाली यांनीही शेवटपर्यंत आईसारखी काळजी घेतली.


हसतमुख निरोप… आणि आठवणींचा गहिवर
१ फेब्रुवारी, गणेश जयंतीच्या दिवशी, संध्याकाळी साडेसातच्या सुमारास
अत्यंत शांत, हसतमुख अवस्थेत त्यांनी देह ठेवला.
त्या रात्री व दुसऱ्या दिवशी सकाळी
राहाता शहरातील असंख्य हिंदू-मुस्लीम बांधव कुटुंबाच्या सांत्वनासाठी उपस्थित होते.
अंत्यविधीवेळी उपस्थित मान्यवरांनी
त्यांच्या सेवेचा, कष्टांचा व माणुसकीचा गौरव केला.


एकच वाक्य… जे कायम आठवत राहील
“मी आहे तुमच्या पाठीशी… तुम्हाला काही कमी पडू देणार नाही.”
हा संदेशच त्यांच्या संपूर्ण जीवनाची चित्तरकथा सांगून जातो.
दिनांक १० फेब्रुवारी रोजी दहाव्याचा कार्यक्रम खटकळी येथे होणार आहे.
वाघमारे कुटुंबाला दुःख सावरण्याची शक्ती लाभो
आणि शशिकला आज्जींना चिरशांती मिळो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
✍️ शब्दांकन : राजेंद्र फंड

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button