Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरक्राईम

मेडिकव्हर हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाईकाची चार तोळ्याची पोत लंपास

मेडिकव्हर हॉस्पिटल संगमनेर मधून सोने लंपास

नाशिक : संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाच्या पत्नीची चार तोळे वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुधाकर आव्हाड (वय ६८ रा. सातपूर नाशिक) हे रविवारी (दि.२५) आपल्या कुटुंबियांसमवेत संगमनेर- देवगड येथे यात्रेसाठी गेले होते. दरम्यान, सुधाकर आव्हाड यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारार्थ संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोन दिवस आयसीयु मध्ये दाखल केल्यानंतर मंगळवारी त्यांना जनरल वार्डमध्ये ठेवण्यात आले. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी सीताबाई आव्हाड होत्या.
दरम्यान, बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास जनरल वॉर्डमध्ये आव्हाड दांपत्य झोपी गेले. झोपण्यापूर्वी सीताबाई आव्हाड यांनी त्यांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याची पोत काढून ठेवली होती. सकाळी उठल्यानंतर पोत जागेवर नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना पाचारण केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. कर्पे, शिरसाठ, थोरात यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. हॉस्पिटल मधील संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button